'एमएमसी'साठी आज मतदान

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 डिसेंबर 2016

मुंबई - महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (एमएमसी) च्या नऊ जागांसाठी राज्यभरात रविवारी (ता. 18) मतदान होत आहे. यासाठी 49 डॉक्‍टर निवडणूक रिंगणात आहेत.

"एमएमसी'मध्ये एकूण 18 सदस्य आहेत. यातूनच नऊ जणांची निवड होणार आहे. यात चार माजी अधिकारी आणि पाच जण राज्य सरकारने नेमणूक केलेले डॉक्‍टर असणार आहेत. राज्यात 110 केंद्रांवर मतदान होणार आहे.

"एमएमसी'चे राज्यातील 85 हजार डॉक्‍टर सदस्य मतदान करणार आहेत. मुंबईत सर्वाधिक 21 हजार मतदार आहेत. निवडणुकीसाठी यंदा सोशल मीडिया, पत्रके, परिषदेच्या माध्यमातून काही दिवस प्रचार सुरू होता. राजकीय पक्षांचा पाठिंबा असलेले प्रगती आणि शिव आरोग्य सेना पॅनलही यंदा रिंगणात असल्याने निवडणुकीत रंगत वाढली आहे.

Web Title: voting for mmc