ठाण्यात बोगस मतदान, उल्हासनगरमध्ये गाडीची तोडफोड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

प्रमुख व्यक्तींचे मतदान
मुंबईत प्रमुख व्यक्तींपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसे प्रमुख राज ठाकरे, मुंबईचे कायदा सुव्यवस्था सह आयुक्त देवेन भारती, मुख्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया, मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता, टीना अंबांनी, रेखा, अनुष्का शर्मा यांनी मुंबईत मतदान केले.

मुंबई - मुंबईसह ठाणे, उल्हासनगर महापालिकांमध्ये आज (मंगळवार) सकाळी मतदानाला सुरवात होऊन काही तास उलटले आहेत. सुरुवातीच्या काही तासात मतदानाचा वेग कमी असला तरी ठाणे, उल्हासगनर येथे थोडा गोंधळ झाला आहे. ठाण्यात शिवसैनिकांनी बोगस मतदार पकडले. उल्हासनगर साई पक्षाचे उमेदवार आशा इदनानी यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली.  

पहिल्या दोन तासात उल्हासनगरमध्ये 7 टक्के मतदान झाले आहे. तर, ठाण्यात मतदान याद्यांच्या गोंधळामुळे काही ठिकाणी नागरीकांमध्ये नाराजी आहे. तर ठाण्यात किसन नगरला अनिल यादव याच्या नावाने दुसऱ्याच व्यक्तीने मतदान केल्यामुळे बोगस मतदानाचा प्रकार उघडकीस आला. अनिल यादव मतदानासाठी गेले असता हा प्रकार समोर आला. वॉर्ड क्रमाक 14 मध्ये शिवसैनिकांनी हे बोगस मतदान पकडून दिले आहे. बोगस मतदान करताना पकडलेल्या व्यक्तींना वर्तक नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पहिल्या दोन तासात ठाण्यात 10.38 टक्के मतदान झाले आहे. मुंबईतही काही मतदार केंद्रांवर मतदार यादीत नावे नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. 

प्रमुख व्यक्तींचे मतदान
मुंबईत प्रमुख व्यक्तींपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसे प्रमुख राज ठाकरे, मुंबईचे कायदा सुव्यवस्था सह आयुक्त देवेन भारती, मुख्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया, मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता, टीना अंबांनी, रेखा, अनुष्का शर्मा यांनी मुंबईत मतदान केले.

Web Title: voting process starts in Mumbai, Thane and Ulhasnagar