अश्‍लील संदेश आत्महत्येचे कारण ठरू शकत नाही 

Mumbai_High_Court
Mumbai_High_Court

मुंबई : पती-पत्नीच्या दुरावलेल्या संबंधांमध्ये पत्नीने तिच्या मित्रांना पाठविलेले अश्‍लील संदेश पतीसाठी त्रास देणारे ठरू शकतात. मात्र ते त्याच्या आत्महत्येस प्रथमदर्शनी कारणीभूत ठरू शकत नाहीत, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे. अशा प्रकारच्या संदेशांमुळे पती किंवा पत्नीचा विश्‍वासघात होऊ शकतो. मात्र त्यामुळे व्यभिचाराचा गुन्हा लागू होऊ शकत नाही, असेही निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. 

आजच्या काळातील अश्‍लील संदेश हिंदू विवाह कायद्याच्या कलम 13 (1) च्या तरतुदीमध्ये अनैतिकता या व्याख्येमध्ये येऊ शकत नाहीत. मात्र अशा संदेशांमुळे पतीला मानसिक आणि भावनिक मनस्ताप होऊ शकतो. कौटुंबिक जीवनात होणारे वाद आणि कलह सहन करण्याची प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी असते. आयुष्य हे नेहमीच खडतर असते. त्यातील प्रसंगांना सामोरे जाण्याची प्रत्येकाची मानसिकता भिन्न असते. काहीजण खंबीरपणे तर काही हतबलपणे समस्यांना सामोरे जातात. मात्र एखाद्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यासाठी तेवढेच ठोस आणि सबळ कारण अभियोग पक्षाकडून दाखल करणे आवश्‍यक असते. त्यामुळे पत्नीच्या मोबाईलमधील अश्‍लील संदेश पाहून जरी पती दुःखी झाला असला तरी त्यामुळे पत्नीने त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असे म्हणता येणार नाही, असे मत न्यायालयाने नोंदवले.

संदेशांमुळे अनैतिकता सिद्ध होत नाही 
ठाण्यातील उच्चस्तरीय बॅंकेत काम करणाऱ्या युवकाने पत्नीशी सतत होत असलेल्या वादांमधून तीन वर्षांपूर्वी स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याबाबत त्याच्या वडिलांनी सुनेच्या विरोधात पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. ही फिर्याद रद्द करण्यासाठी पत्नीने उच्च न्यायालयात याचिका केली होती. याचिकेवर न्या. मृदुला भाटकर यांच्यापुढे सुनावणी झाली. नुकतेच न्यायालयाने निकालपत्र जाहीर केले. अभियोग पक्षाने पती-पत्नीच्या भांडणाचा दावा आत्महत्येच्या आरोपासाठी दाखल केला होता. तसेच पत्नीने केलेल्या चॅटची प्रिंटआऊटसही दाखल केली होती. मात्र चॅटमधून अनैतिकता कायद्यानुसार सिद्ध होत नाही, त्यासाठी प्रत्यक्ष संबंध असणे आवश्‍यक आहे. असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आणि पत्नीवरील फिर्याद रद्द करण्याचे आदेश दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com