अपघातात दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

वाडा (मुंबई) - तालुक्‍यातील वाडा-मनोर या महामार्गावर केळीचा पाडा आणि पोशेरीदरम्यान शनिवारी रात्री 9.30 वाजता दुचाकी आणि टेंपो यांच्यात भीषण अपघात झाला. यात दोघांचा मृत्यू झाला. याच ठिकाणी काही दिवसांपूर्वीच झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता. अक्षय गणेश गवा (वय 21) व सचिन रमेश निसकटे (20) हे दुचाकीवरून वाडा तालुक्‍यात येत असताना केळीचा पाडा या ठिकाणी मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अक्षयचा जागीच मृत्यू झाला, तर सचिन निसकटे हा गंभीर जखमी झाला. सचिनवर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून ठाण्यात हलवण्यात येणार होते. तेथे जात असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.
Web Title: wada mumbai news two death in accident