पालघर: वाडा येथील शाळेत पाणी; विद्यार्थी, शिक्षकांची गैरसोय

दिलीप पाटील
मंगळवार, 27 जून 2017

वाडा येथे समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून इंग्रजी माध्यमाची शाळा चालवली जात आहे. मात्र या शाळेच्या इमारतीच्या छतातून पावसाचे पाणी गळत असल्याने विद्यार्थी व शिक्षकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहेत.

वाडा (जि. पालघर) - वाडा येथे समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून इंग्रजी माध्यमाची शाळा चालवली जात आहे. मात्र या शाळेच्या इमारतीच्या छतातून पावसाचे पाणी गळत असल्याने विद्यार्थी व शिक्षकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहेत.

विद्यार्थी आणि शिक्षकांना शाळेमध्ये गळणारे पाणी चुकवून आपली टेबल खूचीॅ व बॅच मांडावे लागत आहेत. यामुळे त्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. गळतीच्या पाण्यातच विद्यार्थाना अभ्यास लागत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. वाडा शहरात जिल्हा परिषद शाळा दोनच्या शेजारी समाजकल्याण विभागाकडून इंग्रजी माध्यमाची शाळा चालवली जाते. या शाळेत नर्सरी, ज्युनियर के. जी. व सिनियर के. जी. असे तीन वर्ग भरतात. तेथे एकूण 200 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तेथे दोन शिक्षक व दोन मदतनीसही कार्यरत आहेत. जिल्हा परिषद शाळेच्या मालकीची ही इमारत अतिशय जुनी असल्याने या इमारतीला गळती लागली आहे. छतावर ताडपत्री टाकून ही गळती थांबविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, तरीही पावसाचे पाण्याची गळती सुरूच आहे. या पाणी गळतीमुळे महत्वाची कागदपत्रे भिजून खराब होण्याची भीती कर्मचारी व्यक्त करीत आहेत. विशेष म्हणजे पालकांनी वर्गणी गोळा करून इमारतीच्या छतावर टाकण्यात ताडपत्री टाकली आहे.

ठाणे जिल्हा परिषदेचे तत्कालिनन अध्यक्ष कपिल पाटील यांनी मराठी शाळेमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळा प्रायोगिक तत्त्वावर सुरू केल्या होत्या. जिल्ह्यात एकूण 27 शाळा सुरू केल्या होत्या. मात्र त्या बंद झाल्या आहेत. आता त्या शाळा समाज कल्याण विभागाकडून चालविल्या जात आहेत. समाज कल्याण विभागाने याच वर्षीपासून शाळा चालविण्यास घेतल्या आहेत. हे पहिलेच वर्ष असून त्यांना अद्याप मान्यताही मिळालेली नाही. येत्या एक-दोन दिवसात मान्यता मिळेल अशी माहिती येथील मुख्याध्यापक सुनिल मोरे यांनी दिली.

Web Title: wada news palghar news school in water monsoon