
Mumbai News : लोकलमध्ये विसरलेली बॅग केली परत!
मुंबई : नेरुळमध्ये राहणाऱ्या दिपश्री रावत लोकल प्रवासादरम्यान आपली बॅग विसरली होती. यासंदर्भात त्यांनी रेल्वेकडे तक्रार केली होती. त्यानंतर लोकलच्या डब्यामध्ये राहिलेली बॅग वडाळा लोहमार्ग पोलिसांनी शोधून तरुणीला परत केली आहे.
लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीटीबी नगर रेल्वे स्थानकांवर गस्त घालणाऱ्या पोलिसाना सुमारे मंगळवारी रात्री 8:37 वाजता नियंत्रण कक्ष, लोहमार्ग मुंबई, वाडीबंदर येथून फोनद्वारे कळविले की, रात्री 8:43 वाजता डाऊन बेलापुर ला जाणारी लोकलचे सीएसएमटी बाजूकडील पहिला जनरल लेडीज डब्बा प्रवासी दिपश्री रावत यांची एक काळ्या रंगाची बॅग रॅकवर विसरले असल्याचे सांगितले.
तेव्हा वडाळा लोहमार्ग पोलिसांनी गाड़ी अटेंड केली असता सदरची बॅग मिळणून आली. या बॅगेत चित्रकलेचे मटेरियल, ओरिजनल ओळखपत्रे होते. त्यानंतर महिला प्रवासी दिपश्री रावत यांना पोलीस ठाण्यात बोलवून बॅग परत केली आहे.