चिंताजनक ! वागळे इस्टेट, लोकमान्यनगर बनतोय 'हॉटस्पॉट', दरदिवशी 10 कोरोनाबाधितांची वाढ

wagle etate
wagle etate

ठाणे : महापालिका क्षेत्रात सुरवातीच्या टप्प्यात कळवा-मुंब्रा परिसर कोरोनासाठी हॉटस्पॉट समजला जात होता. पण आता या हॉटस्पॉटला मागे टाकून वागळे इस्टेट आणि लोकमान्यनगर हा परिसर कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरु लागला आहे. दरदिवशी येथे नव्याने सुमारे दहा रुग्णांची नोंद या परिसरात होऊ लागली आहे.

वागळे इस्टेट येथील सीपी तलाव परिसरातील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. या दोनही प्रभाग समितीत मिळून 124 कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. ठाणे शहरात आजच्या घडीला कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही साडेतीनशेपर्यंत पोचली आहे. एककीडे कळवा, मुंब्रा भागात कोरोना वाढीचा वेग मंदावला असतांना दुसरीकडे लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती आणि वागळे इस्टेट मागील तीन दिवसात या भागात रुग्णांची संख्या सर्वाधिक वेगाने वाढतांना दिसत आहे. त्यातही वागळे इस्टेट या भागातील सीपी तलाव परिसरात सर्वाधीक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. 

गंभीरबाब म्हणजे, एका नागरिकाच्या चुकीमुळे ही वेळ येथील रहिवाशांवर आल्याचे दिसत आहे.या व्यक्तीच्या घरातीलच 25 ते तीस जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. या व्यक्तीच्या माध्यमातून येथील नागरीकांना मोफत अन्नदान दिले जात होते. परंतु आता तेच त्यांना महागात पडले आहे.  तर लोकमान्य नगर भागातील एका मृत व्यक्तीचा अहवाल उशिराने आल्याने येथील रहिवाशांना आता पालिकेच्या चुकीमुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होतांना दिसत आहे. शुक्रवार र्पयत या दोनही प्रभाग समितीमध्ये प्रत्येकी 62 रुग्ण आढळून आले आहेत. म्हणजेच या दोन प्रभाग समितीमध्ये 124 रुग्ण आहेत.

मुंब्य्रात कोरोनाचे 54 रुग्ण
दुसरीकडे मुंब्य्रात आतार्पयत 54 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर नौपाडा, कोपरी प्रभाग समितीत आतार्पयत 41 जणांना कोरोना लागण झाली आहे. उथळसर 34, कळवा 33, वर्तकनगर 26, माजिवडा मानपाडा 23 आणि दिवा प्रभाग समितीत 9 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. वागळे इस्टेट आणि लोकमान्यनगर परिसर आता शहरासाठी चिंतेचा विषय ठरला आहे.

Wagle Estate, Lokmanya Nagar Hotspot, 10 new patients every day

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com