घरच्या अन्नासाठी प्रतीक्षाच;मल्टिप्लेक्‍सबाबत निर्णय प्रलंबित 

घरच्या अन्नासाठी प्रतीक्षाच;मल्टिप्लेक्‍सबाबत निर्णय प्रलंबित 

मुंबई - मल्टिप्लेक्‍स सिनेमागृहांत घरचे अन्न घेऊन जाण्याच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी अद्याप प्रेक्षकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. मल्टिप्लेक्‍स चालक संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केल्याने तूर्तास हे प्रकरण थंडावले आहे. 

मुंबईसह राज्यभरामधील मल्टिप्लेक्‍समध्ये बाहेरून अन्न पदार्थ आणण्यास मल्टिप्लेक्‍स चालकांनी मनाई केली आहे. याबाबत दिग्दर्शक जैनेद्र बक्षी यांनी न्यायालयात ऍड. आदित्य प्रताप यांच्यामार्फत जनहित याचिकाही केली आहे. न्यायालयानेही आतापर्यंत झालेल्या सुनावणीत व्यवस्थापकांच्या बंदीच्या निर्णयाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. जम्मू-काश्‍मीर सरकारनेही मल्टिप्लेक्‍समध्ये घरचे अन्न आणण्याला परवानगी दिली आहे; मात्र या आदेशाविरोधात मल्टिप्लेक्‍स चालक संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात अपिल याचिका केली आहे. ही याचिका प्रलंबित असल्यामुळे तूर्तास उच्च न्यायालयातील सुनावणीही तहकूब करण्यात आली आहे. याचिकादार बक्षी यांनीही सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणात बाजू मांडण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. मल्टिप्लेक्‍समध्ये घरचे अन्न घेऊन जाण्यासाठी परवानगी देण्याची मागणीही त्यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. मल्टिप्लेक्‍समधील अन्न महाग आणि सर्वसामान्यांना परवडणारे नसते, वृद्ध, गर्भवतींसह लहान मुलांसाठी घरचे अन्न पौष्टिक आणि महत्त्वाचे असते. त्यामुळे तशी परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित असल्यामुळे अद्याप यात कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे लवकरच आम्ही न्यायालयात याचिकेचा उल्लेख करू, असे बक्षी यांनी सांगितले. 

सरकारच्या भूमिकेबाबत संभ्रम 
राज्य सरकारने सुरुवातीला उच्च न्यायालयात याचिकादाराच्या मागणीला सहमती दिली होती; मात्र अचानक यू टर्न घेऊन सुरक्षेचा मुद्दा प्रतिज्ञापत्राद्वारे उपस्थित केला आहे. त्यामुळे सरकारच्या भूमिकेबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com