रस्‍ता दुरूस्तीसाठी प्रतीक्षा

दुरुस्तीसाठी आणलेला रोडरोलर वापराविना रस्त्यावरच उभा आहे.
दुरुस्तीसाठी आणलेला रोडरोलर वापराविना रस्त्यावरच उभा आहे.

खालापूर : पावसाने विश्रांती घेतल्यास मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गाची दुरूस्ती करून देऊ, असे लेखी आश्वासन कंत्राटदाराने तहसीलदार इरेश चप्पलवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत दिले होते. मात्र कंत्राटदाराने दिलेली मुदत मंगळवारी संपत असून खड्डे बुजविताना कंत्राटदाराने उदासीनता दाखविली आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवास अद्याप खडतरच आहे. रस्तेदुरुस्तीसाठी आणलेला रोडरोलरही वापराविना रस्त्यावरच उभा आहे.

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर खालापूर हद्दीत शेडवली ते महड फाटा या मार्गाची दुरवस्था झाली आहे. या मार्गावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहनचालकांना धोका निर्माण झाला आहे. येथे वारंवार अपघात होऊनसुद्धा कंत्राटदाराने रस्तेदुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे मनसेकडून जनआंदोलनाचा निर्णय घेण्यात आला होता. खालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी २ ऑगस्ट आणि ६ ऑगस्टला ईगल इन्फ्राच्या ठेकेदारासोबत बैठक घेतली होती. 

या बैठकीत कंत्राटदाराला रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेबद्दल खडे बोल सुनावल्यावर येत्या १५ दिवसांत रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ता पूर्ववत करू; तसेच पावसाळा संपताच पुन्हा डांबरीकरण करू, असे लेखी आश्‍वासन कंत्राटदाराने दिले होते. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने कामाला वेग येईल, अशी प्रवाशांची अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा फोल ठरली आहे. 

जेसीबी तसेच इतर मशीन आणून काम सुरू आहे. खड्डे बऱ्याच अंशी बुजविले आहेत. रोलरचा वापर देखील दोन दिवसांत करून रस्त्याची डागडुजी करू. 
ए. खान, पर्यवेक्षक, इगल इन्फ्रा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com