वाल्मीक समाज शिवसेनेच्या पाठीशी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

उल्हासनगर - अनेक पक्ष अनुभवले त्यातून निराशा पदरी पडल्याने निराधारांना आधार देणाऱ्या शिवसेनेच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे वाल्मीक समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंह टाक यांनी सांगितले. त्यासाठी १५ फेब्रुवारीला जाहीर मेळावा होणार आहे. या मेळाव्यात राज्यातील सर्व महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 

न्याय मिळवण्यासाठी वाल्मिक समाजाने विविध पक्षांसोबत काम केले; पण समाजाच्या पदरी निराशाच पडली. शिवसेनेच्या कामाची पद्धत वेगळी आणि निर्णायक असते, मग सत्तेत असो किंवा विरोधी पक्षात. वाल्मिकी समुदायातल्या नागरिकांना आणि सर्व अनुसूचित जातींचा समावेश असलेल्या राष्ट्रीय विकास मंचला न्याय मिळावा, यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित चरणसिंह टाक यांनी समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. उल्हासनगर, ठाणे, मुंबईसह राज्यातील १० महानगरपालिका, जिल्हा परिषद या सर्व ठिकाणी शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याचे टाक यांनी सांगितले.

Web Title: Walmik community with Shiv Sena