‘वानखेडे’, ‘ट्रायडंट’ची दहशतवाद्यांकडून रेकी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

२०११ मध्येही केली होती रेकी
इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी वकास अहमद याने २० एप्रिल २०११ रोजी वानखेडेवर मुंबई इंडियन्स व पुणे वॉरिअरदरम्यानच्या सामन्याचे तिकीट खरेदी करून वानखेडे स्टेडियमवर प्रवेश केला होता. त्यानंतर २२ एप्रिलला मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपरकिंगदरम्यानच्या सामन्यादरम्यानही वकास आणि त्याचा साथीदार असदुल्लाह यांनी स्टेडियम परिसराची रेकी केल्याचे दहशतवादविरोधी पथकाच्या चौकशीत उघड झाले होते.

मुंबई - मुंबईतील वानखेडे स्टेडियम, हॉटेल ट्रायडंट, तसेच त्यांना जोडणाऱ्या मार्गांची दहशतवाद्यांनी नुकतीच रेकी केल्याचे उघड झाले आहे.

या पार्श्‍वभूमीवर इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यांदरम्यान कडेकोट बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय क्रिकेटपटूंच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. वानखेडे स्टेडियममध्ये ‘आयपीएल’चे आणखी चार सामने होणार आहेत. तेथून जवळच असलेल्या हॉटेल ट्रायडंटमध्ये क्रिकेटपटूंच्या राहण्याची सोय केलेली असते. या पार्श्‍वभूमीवर दहशतवाद्यांनी ही रेकी केल्याचे उघड झाल्यामुळे स्टेडियम व हॉटेल परिसरात विशेष बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. याशिवाय क्रिकेटपटूंची ने-आण करणाऱ्या बससोबत ‘मार्क्‍समन व्हॅन’ही असते. हॉटेल व स्टेडियमच्या परिसरातील मार्गांवर कोणतेही संशयित वाहन उभे करण्यास मनाई करण्यात आली आहे. सामन्यांपूर्वी तेथून सर्व वाहने हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. क्रिकेटपटूंची ने-आण करणाऱ्या वाहनांच्या चालकांची पडताळणीही करण्यात येत आहे.

Web Title: wankhede stadium hotel trident Terrorist