वानखेडे स्टेडियम क्वारंटाईन सेंटर होणार नाही ? .संजय राऊतांच्या 'त्या' ट्विटला आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर..

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 May 2020

वानखेडे सारखं मोठे मैदान क्वारंन्टाईनसाठी वापरण्याच्या हालचाली सुरू झाल्या असताना ब्रेबोन स्टेडियम ही वापरण्यात यावं, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली. ट्विट करुन राऊतांनी ही मागणी केली. त्यावर आता मागणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. 

मुंबई: मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईत त्याचा सर्वाधिक प्रार्दुभाव झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची वानखेडे स्टेडियम येथे व्यवस्था करता येईल का याची पाहणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली. परिस्थिती अद्याप नियंत्रणात नसल्यानं भविष्यात येणारी आव्हानं लक्षात घेता वानखेडे स्टेडिअम क्वारंटाइनसाठी ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरु आहेत.

 मात्र वानखेडे भागातील स्थानिक नागरिकांनी क्वारंन्टाईन सेंटरला विरोध केला. दरम्यान वानखेडे सारखं मोठे मैदान क्वारंन्टाईनसाठी वापरण्याच्या हालचाली सुरू झाल्या असताना ब्रेबोन स्टेडियम ही वापरण्यात यावं, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली. ट्विट करुन राऊतांनी ही मागणी केली. त्यावर आता मागणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. 

हेही वाचा: ..आणि चक्क मुख्य सचिवांनी हातात घेतला चहाचा ट्रे..स्वतःच्या हातानं दिला सहकाऱ्यांना चहा.. 

पावसाळा तोंडावर असताना असे मैदान वापरणं योग्य ठरणार नसल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. आदित्य ठाकरे यांच्यासह महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी सुद्धा ही मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंनीही ट्विट करुन उत्तर दिल्यानं वानखेडे आणि ब्रेबोन स्टेडियम क्वारंटाइनसाठी वापरलं जाणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. 

संजय राऊतांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, मुंबईत कोरोनाशी लढा देण्यासाठी सर्व संसाधनांचा वापर केला पाहिजे. क्वॉरंटाइन सुविधा देण्यासाठी आपण वानखेडे स्टेडियम ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहोत. ही चांगली गोष्ट आहे. मग वानखेडेसह ब्रेबॉर्न स्टेडियमही का ताब्यात घेतलं जात नाही? असा सवाल संजय राऊत यांनी केला होता. या ट्विटमध्ये संजय राऊतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आदित्य ठाकरे यांना टॅग केलं होतं. 

 

आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या मागणीला विरोध केला. त्यावर आदित्य ठाकरे आपल्या ट्विट म्हणाले की, आपण स्टेडिअम किंवा खेळाची मैदाने ताब्यात घेऊ शकत नाही. मातीची मैदानं असल्याने तिथे पावसाळ्यात चिखल होऊ शकतो. क्वारंन्टाइनसाठी टणक पृष्ठभूमीची गरज असून त्यावर व्यवस्था करता येईल आणि तशी करत आहोत. आदित्य ठाकरे यांच्या उत्तरामुळे वानखेडे मैदाना क्वारंटाइनसाठी वापरलं जाणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. 

हेही वाचा: बायको-मुलांसमोर दारू पिऊ कशी? घरपोच दारूचा पर्याय मिळाला मात्र मद्यप्रेमींची होतेय घालमेल 

मरीन ड्राइव्ह सिटीझन असोसिएशनचा होता विरोध:  

मरीन ड्राइव्ह सिटीझन असोसिएशनने वानखेडेवर क्वॉरंटाइन सेंटर उभारण्यास विरोध केला आहे. पावसाळ्यात या मैदानावर चिखल होऊन आरोग्य सेवेची दाणादाण उडून परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता असल्याची भीती या असोसिएशननं व्यक्त केली. तसंच केंद्राच्या गाइडलाइननुसार रहिवासी विभागात क्वॉरंटाइन सेंटर उभारण्यास मनाई करण्यात आलेली असतानाही वानखेडेचा क्वॉरंटाइन सेंटरसाठी ताबा का घेण्यात येत आहे? असा सवाल या असोसिएशनने उपस्थित केला होता. 

क्वारंटाइनसाठी कोणतंच मैदानात ताब्यात घेतलं जाणार नाही आहे. मैदानांवर चिखल साचत असल्यानं पावसाळ्यात मैदाने घेणं योग्य नसल्याचं मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग यांनी स्पष्ट केलं आहे. आम्ही दुसऱ्या आणि चांगल्या पर्यायांचा शोध घेत आहोत, असंही ते म्हणाले.

wankhede stadium will not convert into quarantine centre aditya thackeray replied to sanajay rauts tweet read full story 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wankhede stadium will not convert into quarantine centre aditya thackeray replied to sanajay rauts tweet read full story