उर्मिलाच्या लेटरबॉम्बमुळे मुंबई काँग्रेसमधील वाद आणखीनच चिघळला

उर्मिलाच्या लेटरबॉम्बमुळे मुंबई काँग्रेसमधील वाद आणखीनच चिघळला

पुणे - लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई मतदारसंघातून पराभूत झालेल्या कॉंग्रेसच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर यांच्या `लेटर बॉम्ब'मुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. 

मुंबई कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांचे विश्वासू सहकारी संदेश कोंडविलकर आणि भूषण पाटील यांच्याविरुद्ध ऊर्मिला मातोंडकरांनी तत्कालीन मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे. मातोंडकरांनी हे पत्र निवडणूक निकाल लागण्यापूर्वी आठवडाभर म्हणजे 16 मे रोजी लिहिले आहे. 

पत्रात म्हटले आहे, की वरील दोन नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव आणि ढिसाळ नियोजन होते. कॉंग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची एप्रिलमध्ये बोरिवलीमध्ये झालेल्या संयुक्त सभेचे आयोजनही ढिसाळ केले होते. 

`कोंडविलकर यांनी आपल्या कुटुंबियांकडे फोन करून निवडणूकीसाठी पैसे मागितले. एवढेच नव्हे, तर कॉंग्रेसचे खजिनदार अहमद पटेल यांच्याशी पैशाबाबत बोलण्यास सांगितले. उत्तर मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष अशोक सुतराळे यांच्याशी अपमानास्पदरित्या दोघे वागले,'' असेही मातोंडकर यांनी पत्रात म्हटले आहे.

कोंडविलकर आणि पाटील यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी करतानाच संघटनात्मक पातळीवर बदल करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. पक्षाच्या भल्यासाठीच आपण हे पत्र लिहित आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com