खारघरमध्ये महिलांनी दगडावर रेखाटले वारली चित्र 

गजानन चव्हाण
सोमवार, 3 जून 2019

खारघर :  पंचतारांकित हॉटेलपासून ते उच्च वर्गीयांच्या घरात वारली चित्राच्या लावलेल्या फ्रेम्स वस्तूच्या सौंदर्यात भर घालतात. घराच्या वास्तूप्रमाणे दऱ्या डोंगरातील दगडावर वारली चित्र रंगवून निसर्ग अधिक निसर्गरम्य करण्यासाठी खारघर मधील काही महिला एकत्र येवून दगडावर वारली चित्र रंगवीत आहे. 

खारघर ओवा टेकडीच्या पायथ्याशी काही वृक्षप्रेमी दोन वर्षापासून रस्त्याचा कडेला आणि डोंगरावर वृक्ष लागवड करून झाडे जागविण्यासाठी झटत आहेत. एवढेच नव्हेतर भर उन्हात झाडांना पाणी देवून वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. लावलेल्या झाडा शेजारी असलेल्या दगडावर वारली चित्र रंगवून निसर्ग अधिक सुंदर दिसेल, झाडे लावणाऱ्या वृक्षप्रेमीचा प्रोत्साहन वाढेल हे उद्देश समोर ठेवून नंदिता माथुर, दीपा लाभे, सुनिता सिंग, तरादेवी सिंघ आणि सुहासिनी आणि सहा वर्षीय तानुषा आदि मिळून ओवा तलाव आणि डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या दगडावर वारली चित्र रंगवीत आहेत.
 
नंदिता माथुर म्हणाल्या, काही वृक्षप्रेमी आपले काम, संसार सांभाळून डोंगरावर झाडे लावून त्यांना पाणी देवून आपल्या मुलाबाळा प्रेमाने जपत आहे. लावलेल्या झाडा शेजारील दगडावर वारली चित्र रंगवून लावलेल्या झाडांची सोभा वाढेल, निसर्ग सुंदर दिसेल आणि वृक्षप्रेमीला प्रोत्साहन वाढेल या विचाराने काही दगडावर वारली चित्र रंगविले असून हा उपक्रम या पुढेही सुरु राहणार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Warali painting made on stone by womens in Kharghar