प्रभाग आरक्षणानंतर आदित्य ठाकरेंच्या वरळीत काय असणार गणित?

कुठे इच्छुकांची गर्दी तर कुठे लॉबिंगला सुरूवात
Aditya Thackrey
Aditya ThackreySakal

मुंबई - राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्र्यांचा मतदार संघ असलेल्या वरळीतही मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग आरक्षणामुळे अनेक गणित बदलणार आहेत. पण वरळीसह, शिवडी आणि भायखळा येथे उमेदवारांची चढाओढ लागली आहे. सर्वाधिक इच्छुकांची गर्दी ही शिवसेनेतील आहे. त्यामुळे शिवसेनेत चढाओढ लागण्याची शक्यता आहे. त्यामध्ये नाराज उमेदवारांनाही आवर घालण्याचे आव्हान शिवसेनेसमोर असणार आहे. याआधीही अनेकांनी दिग्गज नेत्यांसाठी प्रभाग सोडल्याने यंदा मात्र मोठ्या प्रमाणात लॉबिंग होण्याची चिन्हे आहेत.

शिवसेनेचे नगरसेवक आणि माजी बेस्ट समिती अध्यक्ष असलेल्या आशिष चेंबुरकर यांच्या नेतृत्वाखाली शिवडी, वरळी आणि भायखळा हे मतदारसंघ आहेत. शिवसैनिकांना निवडून आणण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करणार आहोत असेही ते म्हणाले. शिवसेनेला आव्हान कधीच नसतं, ग्राऊंड लेव्हलवर आमचं काम आहे, आम्ही मजबूत आहोत असेही ते म्हणाले. आमच्याकडे उमेदवारांसाठी चढाओढ लागेल. 10-12 असज येतील अगदी महिला असो अनुसूचित आरक्षित वॉर्ड असला तरीही काळापासूनच इच्छुकांचे फोन येऊ लागले आहेत. अगदी 10 दिवसात निवडणूका लागल्या तरी तयार आहोत असे ते म्हणाले. याआधी 17 पैकी 14 नगरसेवक होते आता 20 विभाग आहेत त्यापैकी 18 नगरसेवक आम्ही निवडून आणू असेही ते म्हणाले. आदित्य ठाकरे यांचा मतदार संघ आहे, अजय चौधरी, यामिनी जाधव इथे कार्यरत आहेत, आदित्य ठाकरेंनी एवढी काम केली आहेत की 7 ही नगरसेवक निवडून आणू ही।आम्हाला शाश्वती आहे असेही ते म्हणाले.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी याआधीच माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासाठी प्रभाग सोडला होता. असा प्रकार वारंवार होत असल्याने काही पदाधिकारी हे अपक्ष निवडणुक लढवण्याचीही शक्यता आहे. याआधीच संधी हुकल्याने त्यांच्याकडून हा पर्याय अवलंबला जाण्याची शक्यता आहे. याआधी अनेकांना संधी दिली आहे. आता आम्ही लढणार अशीही भूमिका काही शिवसैनिकांनी या भागातून घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेकडून या भागात आऊटगोइंग वाढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये दोन ठिकाणी शाखा प्रमुखांनीच लॉबिंग करायला सुरूवात केली असल्याचेही कळते. त्यामुळे येत्या दिवसात नक्की काय चित्र असणार हे लवकरच स्पष्ट होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com