चंद्रकांत गुडेवार यांना विधिमंडळाकडून समज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

विधानसभा सदस्य सभागृह अवमानप्रकरणी अमरावतीचे तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना विधानसभेच्या न्यायासनासमोर उभे करण्यात येऊन समज देण्यात आली आहे. 

मुंबई : विधानसभा सदस्य सभागृह अवमानप्रकरणी अमरावतीचे तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना विधानसभेच्या न्यायासनासमोर उभे करण्यात येऊन समज देण्यात आली आहे. 

प्रधानमंत्री आवास योजनेची अंतिम यादी जाहीर करण्यापूर्वी लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या, असे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले होते. मात्र, तसे न करता तत्कालीन आयुक्तांनी थेट ही यादी सरकारला जाहीर केली होती. याबाबत आमदार सुनील देशमुख यांनी सभागृहाचा अवमान झाल्याचा प्रस्ताव ठेवला होता. याबाबत चौकशी करून चंद्रकांत गुडेवार यांना हक्कभंग समितीने दोषी ठरवले होते. त्यानंतर आज गुडेवार यांना विधिमंडळात पाचारण करण्यात आले.

Web Title: Warning to Chandrakant Gudewar MLA Insulting issue