कर भरा; अन्यथा पाणी बंद

वसई-विरारमध्ये करवसुलीसाठी नळ जोडण्या तोडण्याचा इशारा.
वसई-विरारमध्ये करवसुलीसाठी नळ जोडण्या तोडण्याचा इशारा.

वसई ः अनेक घरमालक, व्यापारीवर्गाकडून मालमत्ता कर भरणा होत नाही आणि त्याचा परिणाम पालिकेच्या आर्थिक तिजोरीवर होतो. त्यामुळे जास्तीत जास्त मालमत्ता कर वसूल करण्यासाठी महापालिकेच्या मालमत्ता कर संकलन विभागाने कंबर कसली आहे.

आतापर्यंत ९६ कोटी वसूल करण्यात आले असून यापुढे ही मोहीम अधिक तीव्र होणार आहे. कर न भरल्यास बड्या थकबाकीधारकांच्या नळजोडण्या खंडित करण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. 

वसई-विरारचे वाढते नागरीकरण आणि त्यांना आवश्‍यक असणाऱ्या मूलभूत सुविधा महापालिकेच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातात. यासाठी घरपट्टी, शिक्षण, पाणी यांसह विविध कर आकारले जातात. त्यातच मोबाईल मनोऱ्यांकडून वसुली होत नव्हती, तीही महापालिकेने सुरू केली असल्याने पालिकेच्या तिजोरीला हातभार लागत आहे.

साडेसात लाख औद्योगिक व व्यापारी मालमत्ताधारक महापालिकेच्या क्षेत्रात आहेत. मालमत्ता कराची मुदत डिसेंबरअखेरपर्यंत आहे. त्याआधी ९६ कोटी वसूल केले आहेत. जे मालमत्ता कर वेळेवर भरत नाहीत, त्यांना २ टक्के शास्ती कर आकारला जात आहे.

गेल्या वर्षी घोड्यावरून दवंडी पिटणे, मालमत्ता कर भरणा करण्यासाठी वाहनांतून आवाहन तसेच १०० टक्के नोटिसा बजावून पुन्हा स्मरण नोटिसाही महापालिकेने काढल्या होत्या. मोटरसायकल फेरी काढत प्रभागातील लोकप्रतिनिधींनादेखील यात सहभागी करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली होती. 

मालमत्ता विभागातर्फे करवसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा डिसेंबरपर्यंत १५ कोटी अधिक वसुली झाली आहे. नागरिकांनी मालमत्ता कर वेळेवर भरणा करून पालिकेला सहकार्य करावे.
संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त, वसई-विरार महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com