IIT Bombay : जातीवादामुळेच मुलाची आत्महत्या; दलित विद्यार्थ्याच्या कुटुंबाचा दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Darshan Solanki

IIT Bombay : जातीवादामुळेच मुलाची आत्महत्या; दलित विद्यार्थ्याच्या कुटुंबाचा दावा

मुंबई - आयआयटी बॉम्बेच्या एका १८ वर्षीय दलित विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. विद्यार्थ्याचं नाव दर्शन सोळंकी आहे. सोळंकी कुटुंबाने म्हटलं की, दर्शनने आपली बहिण आणि मावशीला आपल्याला जातीवरून मित्रांनी बहिष्कृत केल्याबद्दल सांगितलं होतं. (IIT Bombay news in Marathi)

दुसरीकडे आयआयटी बॉम्बेने म्हटलं की, आमच्या परिसरात कोणताही भेदभाव नाही. दर्शनला छळाला सामोरे जावे लागल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. दर्शनची बहीण जान्हवी सोळंकी म्हणाली, 'गेल्या महिन्यात जेव्हा तो आला तेव्हा त्याने मला आणि माझ्या आई-वडिलांना सांगितले की, तिथे जातीभेद होत आहे. तो अनुसूचित जातीचा असल्याचे त्याच्या मित्रांना कळल्यावर त्यांचे त्याच्यासोबतचे वर्तन बदलले. दर्शनची आई तरलिकाबेन सोळंकी म्हणाली, 'तो तणावाखाली होता, त्याच्यावर अत्याचार होत होते. म्हणूनच त्याने आत्महत्या केली.

दर्शनची मावशी दिव्याबेन म्हणाली, 'महिनाभरापूर्वी जेव्हा तो येथे आला होता, तेव्हा तो सांगत होता की, त्या संस्थेच मोफत शिक्षण मिळत असल्यामुळे इतर विद्यार्थ्यांना त्याचा राग येत होता. ते म्हणायचे की, आम्ही भरपूर पैसे देत असताना 'तुम्ही फुकट का शिकत आहात, असा जाब वाचारायचे.

आयआयटी मुंबईने दर्शन सोळंकीला भेदभावाचा सामना करावा लागल्याचा आरोप फेटाळून लावला असून त्याच्या मृत्यूची चौकशी केली जात असल्याचे म्हटले आहे. 'आयआयटी मुंबईने बीटेकच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्याच्या दुर्दैवी मृत्यूबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचे जोरदार खंडन केले आहे.

टॅग्स :Mumbai Newscrimestudent