वाशीनाका परिसरातील भीम टेकडीवरील एका घरावर दरड कोसळून दोन जण जखमी!

परिसरात बीएआरसीचा मोठा डोंगर आहे.
घरावर दरड कोसळून दोन जण जखमी!
घरावर दरड कोसळून दोन जण जखमी!sakal

चेंबूर : चेंबूर येथील वाशीनाका परिसरातील भीमटेकडीवरील एका घरावर रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दरड कोसळल्याने एकाच घरातील दोन जण जखमी झाले आहेत. अरविंद अशोक प्रजापती वय - 25 आशिष अशोक प्रजापती वय- 20 असे जखमी व्यक्तीची नांवे आहेत.चेंबूर येथील वाशीनाका परिसरातील भारत नगर, बंजारा नगर, भीमटेकडी परिसरातील डोंगराळ भागावर मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी वसलेली आहे.

या परिसरात बीएआरसीचा मोठा डोंगर आहे. त्यामुळे पावसाळ्यात सतत दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. आज रविवारी अचानक या बीएआरसी डोंगरावरील एक भला मोठा दगड कोसळून प्रजापती यांच्या घरात शिरला असता त्यात दोन भाऊ जखमी झाले आहेत. त्यांना उपचारा करीता सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.

आशिष अशोक प्रजापती यांना उपचार दरम्यान घरी सोडण्यात आले तर अरविंद अशोक प्रजापती यांना उपचार करून घरी पाठ पाठविण्यात येणार आहे. या दोघांची प्रकृती धोक्या बाहेर असल्याची माहिती आरसीएफ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब घावटे यांनी माहिती दिलेली आहे.

( चेंबूर येथील वाशीनाका परिसरातील भारत नगर, बंजारा नगर, भीमटेकडी परिसरातील डोंगराळ भागावर मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी वसलेली आहे. या परिसरात सतत दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com