मुंबईत वॉशिंग मशीनचा स्फोट; सुदैवाने बचाविले कुटुंब

Mumbai
Mumbai

मुंबई : वांद्रे पश्चिमेला लिंकिंग रोडवर असलेल्या एका इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये शुक्रवारी वॉशिंग मशीनचा स्फोट झाला. या वेळी शेजाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

नेहा चोप्रा यांच्या फ्लॅटमधील वॉशिंगमशीनचा स्फोट झाला. घटना घडली त्यावेळी त्या घरी नव्हत्या. योगा क्लासासाठी त्या बाहेर गेल्या होत्या. घरामध्ये त्यांची 74 वर्षीय आई कमल सेहगल आणि मुलगी श्रेया दोघींचजणी होत्या. कमल सेहगल एका खोलीत झोपल्या होत्या तर श्रेया दुसऱ्या खोलीत होती. दोघींनी स्फोटाचा आवाज ऐकला नाही किंवा धूर पाहिला नाही. वॉशरुमच्याजवळ ही वॉशिंग मशीन ठेवली होती. घटनेच्या 15 मिनिट आधी नेहा चोप्रा पावणे अकराच्या सुमारास घरातून बाहेर पडल्या.

नेहा यांचा फोन सायलंटवर असल्यामुळे त्यांना कॉल ऐकू येत नव्हता. काही वेळाने त्यांनी मोबाइल तपासला तेव्हा त्यावर शेजाऱ्यांचे त्यांना १५ मिस कॉल दिसले. जेव्हा मला याबद्दल समजले मी लगेच घरी पोहोचले. तेव्हा सर्वजण पायऱ्यांवर थांबले होते. मी आत जाऊन पाहिले तेव्हा धुरामुळे घरात अंधार पसरला होता. नेहा यांच्या शेजारी रिचा भवानी आठव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहतात. त्यांच्याकडे नेहाच्या फ्लॅटची डुप्लीकेट चावी आहे. त्यांनी घरातून धूर येताना पाहिल्यानंतर लगेच खाली धाव घेतली. त्यांनी दरवाजा उघडून आई आणि मुलीला बाहेर आणले असे नेहा चोप्रा यांनी सांगितले. शेजाऱ्यांनी लगेच अग्निशमन दलाला बोलावले. अग्निशमन दलाचे जवान काही मिनिटात पोहोचले व आगीवर नियंत्रण मिळविले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com