कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी राखीव जागेचे बंधन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

मुंबई - मुंबईत कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सोसायट्यांना राखीव जागा ठेवणे बंधनकारक केले आहे. या जागेचा गैरवापर करणाऱ्यांना पाच लाखांचा दंड आकारण्याची तरतूद विकास नियंत्रण नियमावलीत करा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

मुंबईत दररोज सात हजार मेट्रिक टन कचऱ्याची निर्मिती होते. वाढत्या कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्याही वाढत चालली आहे. मुंबईतील बहुतेक क्षेपणभूमींची क्षमता संपुष्टात आली आहे. त्यामुळे भविष्यात कचरा टाकण्याची आणि त्याची विल्हेवाट लावण्याची समस्या तीव्र होण्याबरोबरच ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचून आरोग्याला घातक परिस्थिती निर्माण होण्याची शक्‍यता आहे. यावर उपाय म्हणून 100 किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण होणाऱ्या गृहनिर्माण संस्था आणि 20 हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेत उभ्या राहिलेल्या गगनचुंबी इमारती, वसाहती यांना आवारातच ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मोकळी जागा ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. 

Web Title: Waste disposal obligation to reserve space

टॅग्स