आता प्रत्येक प्रवाशावर सीसी टीव्हीची नजर

आता प्रत्येक प्रवाशावर सीसी टीव्हीची नजर

मुंबई - रेल्वे प्रवास भीतीविरहीत आणि उपद्रवमुक्‍त करण्यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून याअंतर्गत लोकलचे सर्व डबे, मेमू आणि डेमूमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या तब्बल १० हजार ३४९ डब्यांमध्ये हे कॅमेरे बसवण्यात येणार असून, त्यासाठीच्या ३५६ कोटींच्या खर्चाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.

या प्रकल्पासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात सध्या पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. सुरुवातीच्या टप्प्यात मुंबईच्या लोकलमधील महिलांच्या डब्यात हे कॅमरे बसवले जाणार आहेत. मुंबईतील सर्वच रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत; तर महिलांच्या केवळ २५ डब्ब्यांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. २०१७ च्या सप्टेंबरमध्येच महिलांवर होणारे वाढते हल्ले लक्षात घेऊन महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता; मात्र त्याची अद्याप काटेकोर अंमलबजावणी करण्यात आलेली नसल्याचे दिसून येत आहे.

मध्य रेल्वेने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला होता. त्यानुसार यासाठी अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली आहे. याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनंसपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी हा प्रस्ताव मंजूर झाल्याची माहिती दिली. मुंबई उपनगरीय मार्गावरील लोकलबरोबरच दिवा ते रोहा, दिवा ते वसई मार्गावर धावणाऱ्या मेमू गाड्या आणि पुणे-लोणावळा लोकल व नागपूरसह मध्य रेल्वे मार्गावरील सर्व डेमू गाड्यांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. याचा सर्वांत जास्त फायदा मुंबईकरांना आहे.

टाटा समाज विज्ञान संस्थेने काही वर्षांपूर्वी लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांचे सर्वेक्षण केले होते. त्यात मोठ्या प्रमाणात महिलांना प्रवासादरम्यान अनेक वेळा विकृत स्पर्श किंवा हावभाव सहन करावे लागतात अशी तक्रार केली होती. त्यानंतर महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

चेहरा स्पष्ट ओळखता येणार
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये अनेक वेळा संशयित व्यक्तीचा चेहर स्पष्ट दिसत नाही; मात्र नव्या तंत्रज्ञानावर आधारित कॅमरे आणण्याचा प्रस्ताव रेल्वे सुरक्षा बलाकडून पाठवला जाण्याची शक्‍यता आहे. त्यात स्वयंचलित पद्धतीने डब्यातील जास्तीत जास्त व्यक्तींचा चेहरा स्पष्ट दिसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com