esakal | ठाणे जिल्ह्यात पाणीचिंता मिटली; भातसा धरण काठोकाठ
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

ठाणे जिल्ह्यात पाणीचिंता मिटली; भातसा धरण काठोकाठ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : गुलाब चक्रीवादळामुळे मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाची गेले दोन-तीन दिवस दमदार बॅटिंग सुरू आहे. जिल्ह्यातील भातसा, बारवी ही मोठी धरणे आधीच काठोकाठ भरली असताना, या पावसामुळे या धरणांमधील पाणीसाठ्यात प्रचंड वाढ झाली आहे. परिणामी या दोन्ही धरणांचे दरवाजे उघडून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, गुलाब चक्रीवादळामुळे मुंबई, ठाणेसह इतर शहरांची पाणीचिंताही मिटली आहे.

हेही वाचा: ‘शरद पवार यांच्यासारखा नेता राष्ट्रवादीकडे आहे याचा इतर पक्षांना हेवा वाटतो’

ठाणे जिल्ह्यात पावसाने यंदा दमदार हजेरी लावली. ठाणे-मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्वच धारणांच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन ही धरणे वाहू लागली आहेत. तुळशी, विहार, मोडकसागर ही धरणे १०० टक्के भरली आहेत. भातसा, बारवी ही धरणे ९९ टक्के भरली आहेत.

loading image
go to top