सफाळ्यातील विविध रस्त्यावर पाणी; शाळांना सुट्टी 

प्रमोद पाटील 
मंगळवार, 10 जुलै 2018

सफाळे - गेल्या दोन दिवसांपासून पालघर जिल्हयात सुरू असलेल्या धुवांधार पावसाने सर्व रस्त्यांवर पाणी आले असून, रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेसह सर्व वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने जाहीर करण्यापूर्वी विविध शाळांच्या व्यवस्थापनाने आज मंगळवारी (ता.10) सुट्टी जाहीर केली आहे. पालघर तालुक्यातील वेगवेगळ्या माध्यमाच्या शाळा मंगळवारी बंद आहेत. 

पालघर -सफाळे, केळवे- केळवे रोड, सफाळे- दातीवरे, सफाळे- टेंभीखोडावे या रस्त्यावर पाणी आल्याने या रस्त्यावर वाहतूक सकाळ पासूनच बंद आहे. जयपूर- वांद्रे एक्सप्रेस आणि सौराष्ट्र मेल या गाड्या पालघर स्थानकात तर अवंतिका एक्सप्रेस सफाळे स्थानकात उभी आहे. नालासोपाराला पाणी भरल्यामुळे उपनगरीय वाहतुक बंद आहे. विरारला पाच नंबर फालाटावर भुज एक्सप्रेस आणि सहा नंबर फलाटावर जामनगर उभी आहे. लोकशक्ती नारींगी फाटकात उभी आहे. ही परीस्थीती सकाळी साडे पाच वाजता पासून आहे.

प्रवाशांना सुचना देण्यात येत आहे की, नालासोपाराला रेल्वे रुळाव पाणी भरल्याने पुढील सुचना मिळेपर्यत लोकल जाणार नाही.दरम्यान, पालघर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक व प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी आपत्कालीन परिस्थितीमुळे वसई, पालघर, डहाणू व तलासरी या चार तालुक्यातील वेगवेगळ्या माध्यमाच्या शाळा मंगळवारी( ता.10) बंद राहतील असे कळविले आहे.

Web Title: Water on different streets in the safale