पाणी, वीजबिलासाठी जुन्या नोटा स्वीकारणार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

मुंबई - केंद्र सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या चलनी नोटा व्यवहारातून रद्द केल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर जनतेकडून पाणी, वीज, मालमत्ता कर यासह इतर शासकीय देयकांचा भरणा करताना 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या चलनी नोटा 11 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत स्वीकारण्याची परवानगी देण्याची विनंती राज्याने केंद्र सरकारकडे केली होती. ही विनंती केंद्र शासनाने मान्य केल्याने जनतेची मोठ्या प्रमाणावर सोय होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तशा सूचना महावितरणसह संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. 

सरकारी बिलांचा भरणा जुन्या नोटांद्वारे करण्यासंदर्भात निर्णय घेऊन जनतेस दिलासा देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला आहे. बॅंक आणि टपाल खात्यात 500 व 1000 रुपयांच्या चलनी नोटा स्वीकारण्याची मुदत डिसेंबरअखेरपर्यंत आहे. या निर्णयामुळे शेतकरी आणि गृहिणींच्या पैशाला कोणतीही बाधा येणार नाही. कष्टाने कमावलेला पैसा सुरक्षित राहणार असून, त्यामुळे जनतेने गोंधळून जाऊ नये, तसेच गर्दी करू नये. काळा पैसा आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे आपण सर्वांनी मिळून स्वागत करूया, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

Web Title: Water, electricity bill to accept the old notes