
Mumbai News : दावडी गावातील पाणी प्रश्न पोलीस ठाण्यात
डोंबिवली - कल्याण डोंबिवलीतील 27 गावातील पाण्याची समस्या अजूनही सुटलेली नाही. या पाणी प्रश्नावरून आंदोलन, मोर्चे होऊनही पाणी समस्या सुटलेली नाही. याच पाणी प्रश्नावरून दावडी गावात स्थानिक माजी नगरसेवकाच्या मुलाने एका मंदिराच्या पुजाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे.
स्थानिक माजी नगरसेवकाने पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले असते तर गावात पाणी समस्या आज उद्भवली नसती, असे वक्तव्य पुजाऱ्याने केले. याचा राग आल्याने माजी नगरसेवकाच्या मुलाने या पुजाऱ्याला शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली. हा वाद मानपाडा पोलीस ठाण्यात पोहोचला असून पुजारी हरीशंकर पांडे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
कल्याण-शिळ महामार्गावरील दावडी गाव व परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याची समस्या भेडसावत असल्याने या भागातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. स्थानिक नगरसेवक जालिंदर पाटील हे काही रहिवाशांशी चर्चा करत होते.
स्थानिक माजी नगरसेवकाने पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले असते तर गावात पाणी समस्या आज उद्भवली नसती, असे वक्तव्य पुजाऱ्याने केले. याचा राग आल्याने माजी नगरसेवकाच्या मुलाने या पुजाऱ्याला शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली. हा वाद मानपाडा पोलीस ठाण्यात पोहोचला असून पुजारी हरीशंकर पांडे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
कल्याण-शिळ महामार्गावरील दावडी गाव व परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याची समस्या भेडसावत असल्याने या भागातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. स्थानिक नगरसेवक जालिंदर पाटील हे काही रहिवाशांशी चर्चा करत होते. या परिसरात असलेल्या राम मंदिराचे पुजारी हरीशंकर पांडे यांनी मात्र नगरसेवक पाटील यांना लक्ष केले.
पाणी समस्येला नगरसेवक जबाबदार आहे. नगरसेवकाने प्रयत्न केले असते तर हा प्रश्न सुटला असता. पाणी समस्येकरिता लोकांनी त्यांना जाब विचारला पाहिजे, असे पुजारी पांडे यांनी वक्तव्य केले.
ही चर्चा भाजपाचे माजी नगरसेवक जालिंदर पाटील यांच्यापर्यंत पोहोचली. जालिंदर पाटील यांनी पुजारी पांडे यांना जाब विचारला. पाटील यांचा मुलगा दीपेश याने तर पुजारी हरीशंकर पांडे यांना शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली. माझ्या वडिलांची बदनामी का करतो ? असा जाब विचारत तुला मारणार अशी धमकी दिली.
पुजारी पांडे यांनी या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. माजी नगरसेवक जालिंदर पाटील यांनी मात्र असा प्रकार घडलेला नसल्याचे सांगून जे काही झाले ते गैरसमजातून झाले आहे. पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मी काय आणि किती प्रयत्न केले हे सगळ्यांना माहित असल्याचा दावा त्यांनी केला.