कल्याण पूर्वमध्ये पाणी समस्या ; मनसेचे मटका फोडो आंदोलन

रविंद्र खरात
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

कल्याण : कल्याण पूर्व आमराई परिसरात मागील तीन ते चार महिन्यांपासून पाणी समस्या असून, ती समस्या दूर न झाल्याने मनसेने कल्याण पूर्व पालिका (ड) प्रभाग क्षेत्र कार्यालयामध्ये मटकाफोड, हंडा मोर्चा आणि ठिय्या आंदोलन करत आपला निषेध व्यक्त केला . 

कल्याण : कल्याण पूर्व आमराई परिसरात मागील तीन ते चार महिन्यांपासून पाणी समस्या असून, ती समस्या दूर न झाल्याने मनसेने कल्याण पूर्व पालिका (ड) प्रभाग क्षेत्र कार्यालयामध्ये मटकाफोड, हंडा मोर्चा आणि ठिय्या आंदोलन करत आपला निषेध व्यक्त केला . 

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात पावसाची दमदार हजेरी झाली असताना कल्याण पूर्वमध्ये अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना त्रास असून, कल्याण पूर्व मधील आमराई परिसरात मागील तीन ते चार महिने पाणी समस्या निर्माण झाली असून, त्यावर तोडगा काढण्यात पालिका पाणीपुरवठा विभाग अपयशी ठरल्याने आज शनिवार ता 4 ऑगस्ट रोजी कल्याण पूर्व पालिकेच्या ड प्रभाग क्षेत्र कार्यालयावर मनसे माजी नगरसेवक अनंता गायकवाड नेतृत्वाखाली योगेश गव्हाणे ( उपशहरअध्यक्ष) मनिष श यादव ( शाखाध्यक्ष ) निखिल जाधव ( उपशाखाध्यक्ष) विनित भोई, देवेंद्र पिंगळे ( विभाग अध्यक्ष) जयेश गायकवाड (उपविभाग अध्यक्ष) भूषण लांडे ( मनविसे उपशहर अध्यक्ष) आदी समवेत स्थानिक नागरिकांनी हंडा मोर्चा काढला. मात्र, अधिकारी वर्ग लक्ष देत नसल्याने त्या परिसरात मटका फोड आंदोलन केले तर कार्यालय बाहेर ठिय्या आंदोलन केले.

तब्बल तीन तासानंतर पालिकेचे पाणी पुरवठा विभाग कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांनी आंदोलनकर्त्याची भेट घेत पाणी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले . 

''या आठवड्यात पाणी समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले असून, समस्या दूर न झाल्यास पालिका मुख्यालयामध्ये जाऊन उग्र आंदोलन करू'', असा इशारा मनसे माजी नगरसेवक अंनता गायकवाड यांनी दिला. 

कल्याण पूर्वमध्ये काही भागात पाणी येत नाही. म्हणून आंदोलनकर्ते बोलत होते. त्याबाबत अधिकारी वर्गाची बैठक घेऊन नेमकी काय समस्या आहे. त्यावर तोडगा काढला जाईल, अशी माहिती पालिका पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांनी दिली .

Web Title: Water Problem in Kalyan MNS aggressive