पश्‍चिम उपनगरात पाणीबाणी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

मुंबई  - पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यापासून मुंबईत पाणी संकट कोसळण्याची शक्‍यता आहे. त्याचा सर्वाधिक फटका पश्‍चिम उपनगरांना बसणार आहे. पश्‍चिम उपनगरांची वितरण व्यवस्था विस्तीर्ण असल्याने पाणीटंचाईचा परिणाम जाणवू शकतो. हिवाळ्यात पाण्याची मागणी कमी होणार असल्याने त्या काळात पाण्याची बचत करून ते उन्हाळ्यात वापरले जाण्याची शक्‍यता आहे. 

मुंबई  - पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यापासून मुंबईत पाणी संकट कोसळण्याची शक्‍यता आहे. त्याचा सर्वाधिक फटका पश्‍चिम उपनगरांना बसणार आहे. पश्‍चिम उपनगरांची वितरण व्यवस्था विस्तीर्ण असल्याने पाणीटंचाईचा परिणाम जाणवू शकतो. हिवाळ्यात पाण्याची मागणी कमी होणार असल्याने त्या काळात पाण्याची बचत करून ते उन्हाळ्यात वापरले जाण्याची शक्‍यता आहे. 

मुंबईत यंदा गरजेपेक्षा एक लाख दशलक्ष लिटर पाणीसाठी कमी होता. ऑक्‍टोबर हिटमुळे पाण्याची मागणी 5 ते 10 टक्‍क्‍यांनी वाढली आहे. परिणामी अनेक भागांमध्ये पाणी कमी पडू लागले होते. थंडीच्या मोसमात पाण्याची मागणी कमी होईल. पुन्हा एप्रिल-मे महिन्यांत पाच ते 10 टक्के पाण्याची मागणी वाढेल, अशी शक्‍यता वर्तवली जात आहे; मात्र यंदा तलावांमध्ये पाण्याची पातळी कमी असल्याने उन्हाळ्यात पाणीपुरवठा करताना दाब नियंत्रण करणे अवघड होण्याची शक्‍यता आहे. 

पश्‍चिम उपनगरांची वितरण व्यवस्था विस्तीर्ण आहे. त्यामुळे वितरण व्यवस्थेच्या टोकाला असलेल्या वस्त्यांपर्यंत कमी पाणी पोहचण्याची शक्‍यता आहे. डोंगराळ वस्त्यांमध्येही अधिक फटका जाणवण्याची शक्‍यता आहे. 

जुलै महिन्यापर्यंत पुरेल एवढे पाणी तलावांमध्ये असल्याचा दावा जलअभियंता अशोक कुमार तवाडिया यांनी याआधीच केला आहे; मात्र उन्हाळ्यात पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे अवघड होणार आहे. 

नोव्हेंबरमध्ये निर्णय 
ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या आढावा बैठकीत पाणीकपातीबाबत निर्णय झाला नाही. आता नोव्हेंबर महिन्यात पाणी खात्याची पुन्हा आढावा बैठक होणार आहे. त्या बैठकीत पाणी कपातीबाबत निर्णय होण्याची शक्‍यता आहे. 

पश्‍चिम उपनगराची वितरण व्यवस्था 
- पश्‍चिम उपनगरांचा पूर्व-पश्‍चिम असा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. 
- वांद्रे जलकुंभातून, वांद्रे पूर्व-पश्‍चिम विभागाला पाणीपुरवठा. 
- वेरावली (जोगेश्‍वरी) जलकुंभातून, अंधेरी, विलेपार्ले, सांताक्रूझ, वांद्रे आदी काही भागांत पाणीपुरवठा. 
- मालाड जलकुंभातून, गोरेगाव आणि मालाडमध्ये पुरवठा. 
- बोरिवली जलकुंभातून, कांदिवली, बोरिवली आणि दहिसरमध्ये पाणी. 
- पाच ते दहा दशलक्ष लिटर क्षमता. 

Web Title: water problem in western suburbs