4600 विहिरी तहान भागवणार! 

4600 विहिरी तहान भागवणार! 

मुंबई - पाणीटंचाईची तीव्रता वाढत जाईल; तसेच इतर वापरासाठी लागणाऱ्या पाण्याची गरज भागविण्यासाठी मुंबईतील पालिका, सरकार आणि विविध प्राधिकरणांच्या अखत्यारीत असलेल्या जमिनींवरील चार हजार 600 विहिरी खुल्या केल्या जाण्याची शक्‍यता आहे. पाणी संकटाशी सामना करण्यासाठी आतापासूनच महापालिकेने विहिरींमधील पाणीसाठ्याच्या संरक्षणाच्या हालचाली सुरू केल्या असल्याचे समजते. 

मुंबईत 11 हजार 500 विहिरी, बोअरवेल आणि रिंगवेल आहेत. त्यांचाही वापर पाणीटंचाईची वेळ आलीच तर केला जाणार आहे. त्यापैकी पालिका, सरकार आणि विविध प्राधिकरणांच्या जमिनींवर चार हजार 600 इतक्‍या विहिरी आहेत. पालिकेच्या अखत्यारित असलेल्या विहिरींतील पाण्याचा सुरक्षित वापर करण्याबाबत पालिका लवकरच निर्णय घेणार असल्याचे समजते. खासगी, सरकारी आणि विविध प्राधिकरणांच्या जमिनींवरील विहिरी मात्र धोकादायक स्थितीत असून, त्या स्वच्छ आणि सुरक्षित करून त्यातील पाणीही टंचाईच्या काळात वापरण्यात येणार असल्याचे समजते. 

पावसाळा लांबला आणि मुंबईत पाणीटंचाई निर्माण झाली की, मुंबईतील विहिरींची आठवण सर्वांना होते. 2009 मध्येही अशा परिस्थितीत मुंबईतील सर्व विहिरी साफ करण्याचा आणि पाणीटंचाईच्या काळात त्या नागरिकांना खुल्या करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. त्याबाबत संबंधितांना पालिकेने नोटिसाही पाठविल्या होत्या. मात्र, खासगी विहिरींच्या मालकांनी आणि विविध प्राधिकरणांनी पालिकेच्या आवाहनाला फारसा प्रतिसाद दिला नाही. खासगी मालकांनी त्याकडे दुर्लक्षच केले. शहर आणि उपनगरांतील बहुतांशी विहिरी तुटलेल्या, गाळाने बुजलेल्या आणि खराब अवस्थेत आहेत. काही विहिरी बिल्डरांनी इमारती बांधताना बुजविल्या आहेत. पालिकेने मुंबईतील सर्व विहिरी ताब्यात घेऊन त्यांचे रक्षण करण्याचे ठरले होते. त्याबाबत स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय झाला होता; मात्र पुढे काहीही हालचाल झाली नाही. 

पालिकेच्या अखत्यारीत असलेल्या विहिरींची काळजी आम्ही घेतो. पालिकेचे सहायकअभियंता (परिरक्षण) यांच्याकडे विहिरींच्या देखभालीची जबाबदारी आहे. सरकारी आणि खासगी जागेत असलेल्या विहिरींची जबाबदारी त्या त्या प्राधिकरणाची आहे. पाणीटंचाईच्या काळात आम्ही विहिरींच्या मालकांना नोटिसा बजावल्या आहेत. विहिरींची सफाई आणि देखभालीबाबत त्यांना नोटिसा दिल्या आहेत. 
- राजन नारिंग्रेकर, कीटकनाशक अधिकारी, मुंबई पालिका 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com