मुंबईत पाण्याचा 'शट डाऊन'

Water
Water

काही भागात दोन दिवस पाणी नाही
मुंबई - मुंबई पालिकेने काही विभागातील जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने काही विभागातील पाणी पूरवठा खंडित करण्यात येणार आहे. दिनांक 9 आणि 10 जुलै रोजी तानसा (प) या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे के/पूर्व, एच/पूर्व आणि जी/उत्तर विभागातील पाणीपुरवठा खंडित केला जाणार आहे. तर महानगरप‍ालिकेतर्फे पवई येथील तानसा (पश्चिम) 1800 मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम व जी/उत्तर विभागातील धारावी येथील माहीम फाटकाजवळ 1800 मि.मी. व्यासाची वैतरणा व अप्पर वैतरणा जलवाहिनी खंडि‍त करण्या चे काम हाती घेण्यात येणार आहे. 

सदर काम हे मंगळवार, दिनांक 9 जुलै रोजी दुपारी 12 वाजल्याापासून बुधवार, दिनांक 10 जुलै रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 24 तासांसाठी हाती घेण्यात येणार आहे. यामुळे काही विभागांतील पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील. सदर दुरुस्तीच्या कालावधीमध्ये पाणी साठवून जपून वापरावे आणि प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पालिकेतर्फे नागरिकांना करण्यात आले आहे.

कोणत्या विभागात पाणी पुरवठा नाही
के/पूर्व विभाग

के/पूर्व विभागातील छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअर पोर्ट, एम. आय. डी. सी. ट्रान्स रेसिडेन्सीे, सुभाष नगर, सारीपुत नगर, विजय नगर, पोलिस कॅम्प,मरोळ गांवठाण, मिलिटरी रोड, भवानी नगर, चिमटपाडा, सगबाग, मकवाना रोड, ओम नगर, सहर गांव, प्रकाशवाडी, गोविंदवाडी, इस्लामपुरा, पारसीवाडा, चकाला गांवठाण, जे. बी. नगर, मुळगांव डोंगरी, बामणवाडा, कबीर नगर, लेलेवाडी, टेक्निकल क्षेत्र, तरुण भारत सोसायटी, एअर पोर्ट परिसर. 

एच/पूर्व विभाग
वांद्रे टर्मिनस परिसर. 

जी/उत्तर विभाग
मंगळवार, दिनांक 9 जुलै रोजी - धारावी सायंकाळचा पाणीपुरवठा – धारावी मेन रोड, गणेश मंदीर रोड, ए. के. जी. नगर रोड, कुंभारवाडा, संत गोराकुंभार रोड व दिलीप कदम मार्ग.

जी/उत्तर विभाग
बुधवार, दिनांक 10 जुलै रोजी - धारावी सकाळचा पाणीपुरवठा – 
प्रेम नगर, नाईक नगर, 60’ रोड, जस्मिन मिल रोड, मांटुगा लेबर कॅम्प, 90’ रोड, एम. जी. रोड, धारावी लुप रोड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com