ऐन उन्हाळ्यात पाणी केले बंद

अच्युत पाटील
शनिवार, 28 एप्रिल 2018

बोर्डी : बोर्डी ग्रामपंचायतीने ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद करून ग्रामस्थांना वेठिस धरण्याचा अमानुष प्रकार केल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. या प्रकरणी शुक्रवारी (ता.27) झालेल्या ग्रामसभेतही प्रचंड वादावादी झाली. ग्रामस्थांनी केलेल्या प्रश्नाच्या भाडिमाराला उत्तर देताना सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकाची त्रेधातिरपीट उडाली. अखेर बंद केलेला पुरवठा तातडीने सुरू करावा लागला.

मागील तीस वर्षापासून बोर्डी ग्रामपंचायत क्षेत्रात तात्पुरत्या नळपाणी योजनेच्या माध्यमातून केलेल्या प्रकल्पातून समाधानकारक पाणी पुरवठा सुरू आहे.

दरम्यान राष्ट्रीय पेयजल योजनेतंर्गत 2016-17 पासून सात कोटी रुपये खर्चाची पाणी पुरवठा योजना पुर्ण झाल्याने अस्वाली धरणाचे पाणी ग्रमस्थांना घरोघरी देण्याची सुरुवात करण्यात आली आहे.

परंतु अस्वाली धरणाचे पाणी नियमित व अशुद्ध  पिण्यासाठी योग्य नसल्याने, तसेच पाण्याची जोडणी घेण्यासाठी घरटी आठ हजार रुपये अनामन भरावयची असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.

दरम्यान नळपाणी पुरवठा सुरळीत होण्यापुर्विच दुरुस्तिच्या कामात लाखो रुपयांचा खर्च होवून पुरवठा योजेनेचे पांढऱ्या हत्तित रुपांतर झाल्याने,चक्क ग्रामस्थांचे पाणीच बंद करून नाक दाबण्याचा अमानूष प्रकार करून जोडण्या घेण्याची जबरदस्ती करण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थ करित आहेत.
 विषयाचे गांभीर्य  लक्षात घेऊन तातडीने जिल्हा परिषद अध्यक्ष विजय खरपडे यांनी ग्रामपयत सरपंच उपसरपंच यांचे सोबत चर्चा केली. व कोणत्याही परिस्थितीत पाणी पुरवठा बंद करता येणार नाही अशी तंबी वजा आदेश ग्रामपंचायतिला देण्यात आले असल्याचे सकाळला सांगितले.

पाणी बंद करून लोकांना वेठिस धरण्याचा कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला नव्हता.आणि घेणार नाही मात्र काही निर्णय उतावळेपणे घेतल्याची कबुली उपसरपंच दिनेश ठाकोर यांनी दिली.

1987-88 च्या दरम्यान तात्पुरत्या नळपाणी पुरवठा योजना राबविण्यात आल्या सुदैवाने या योजनांची देखभाल चांगली झाल्याने पाणी पुवरठ्याबाबत ग्रामस्थ समाधानी आहेत.

मात्र केंद्र सरकारच्या धोरणा प्रमाणे शुद्ध पाणी नागरिकांचा मुलभूत हक्क असल्याने अस्वाली धरणावर सात कोटी रुपये खर्चाची योजना राबविण्यात आली असली तरी तेथे जलशुद्धीकरण प्रकल्प नसल्याने नळाला येणारे पाणी शुद्ध नाही.अशा परिस्थितीत नळजोडण्या घेण्यासाठी पाणी बंद करून वेठीस धरणे म्हणजे बेजबाबदार पणा आहे.अशी प्रतिक्रिया माजी सरपंच विजय म्हात्रे यांनी व्यक्त केली.

Web Title: water supply close in summer