गणेशपूरीची पाणीटंचाई मिटणार

 दीपक हीरे
गुरुवार, 29 मार्च 2018

वज्रेश्वरी -  दररोज शेकडो भाविकांची वर्दळ असलेल्या व महत्वाचे धार्मिक स्थळ असलेल्या गणेशपूरीतील पाणीटंचाई मिटणार आहे. भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने राज्य सरकारने उसगाव धरणातून गणेशपूरीला पाणी सोडण्याचे मंजूर केले आहे. या निर्णयामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला असून, पर्यटकांनाही पाणीटंचाईचा फटका बसणार नाही.

गणेशपूरीमध्ये दररोज शेकडो भाविकांची वर्दळ असते. गावाची लोकसंख्या दहा हजारांच्या घरात आहे. सध्या गावाला अकलोली येथील छोट्या धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, तो अपुरा असल्यामुळे ग्रामस्थांचे हाल होतात. त्याचबरोबर पर्यटकांना सुविधा पुरविण्यासाठी अडचणी येतात. त्यामुळे गणेशपुरीचे सरपंच विनोद पांडूरंग पाटील यांनी खासदार कपिल पाटील यांच्याकडे वाढीव पुरवठ्याची मागणी केली होती.

उसगाव धरणातून गणेशपूरी गावाला पाणी मंजूर करण्यासाठी खासदार कपिल पाटील यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आग्रह धरला होता. गणेशपूरीचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन वाढीव पाणीपुरवठ्याची गरज स्पष्ट केली होती. ही मागणी मंत्री गिरीश महाजन यांनी मंजूर करुन उसगाव धरणातून 0.121 दशलक्ष घनमीटर पाणीकोटा मंजूर केला. या निर्णयामुळे ग्रामस्थांबरोबरच पर्यटकांचीही तहान भागणार आहे.

Web Title: water supply to ganeshpuri from usgaon dam