पाणी चोरी केल्यास फौजदारी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

मुंबई - राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने अनिर्बंध पाणी उपसा रोखण्यावर भर दिला आहे. त्यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली असून, यापुढे जलाशय अथवा कालव्यातून पाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

राज्य सरकारने ऑक्टोबरअखेर १५० तालुक्यात तसेच २६८ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केला. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारने अनधिकृत पाणी उपशाला चाप लावण्याचे ठरवले आहे. विनापरवानगी पाणी उपसा करणाऱ्यांना जरब बसावी म्हणून पाणी चोरांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबरोबर त्यांच्यावर दंडात्मक करवाई करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे.

Web Title: Water Theft Crime