मराठी रंगभूमी समृद्ध करणारा अभिनेता गमावला : मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

प्रसिद्ध अभिनेते विजय चव्हाण यांच्या  निधनाने मराठी चित्रपट, नाटक आणि मालिका या तिन्ही माध्यमांना व्यापून टाकणारा एक गुणी व अष्टपैलू अभिनेता आपण  गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

मुंबई : प्रसिद्ध अभिनेते विजय चव्हाण यांच्या  निधनाने मराठी चित्रपट, नाटक आणि मालिका या तिन्ही माध्यमांना व्यापून टाकणारा एक गुणी व अष्टपैलू अभिनेता आपण  गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणाले की, विजय चव्हाण यांना एक ताकदीचा विनोदी अभिनेता म्हणून मराठी रसिक ओळखतातच, मात्र त्यासोबत त्यांनी गंभीर आशयाच्या भूमिकाही समर्थपणे साकारल्या. मोरुची मावशी, श्रीमंत दामोदर पंत, टूरटूर, हयवदन यांसारखी अनेक नाटके त्यांच्या कसदार अभिनयाने प्रचंड लोकप्रिय झाली. त्यांच्याकडे विनोदाचं उत्तम टायमिंग होते.

चित्रपट आणि दुरचित्रवाणी मालिकांमध्येही त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला होता. मराठी सिनेसृष्टीच्या अलिकडच्या कालखंडातील स्थित्यंतरात चव्हाण यांनी बहुमूल्य योगदानही दिले होते . त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमीचे मोठे नुकसान झाले आहे.

Web Title: we lost a good actor from marathi film industry said chief minister devendra fadnavis