'राहुल गांधींची "विकेट' आम्हीच काढणार'

'राहुल गांधींची "विकेट' आम्हीच काढणार'

कल्याण - कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे आगामी लोकसभा निवडणूक महाराष्ट्रातून लढणार असल्याची चर्चा आहे. ते कोठूनही लढले तरी आम्हाला काहीच फरक पडत नाही. मात्र, आगामी निवडणुकीत त्यांची विकेट आम्हीच काढणार, असा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी (ता. 23) दिला. 

कल्याणमधील पोटे मैदानात आयोजित करण्यात आलेल्या कोकण महोत्सवात ते बोलत होते. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी देशासाठी चांगले काम करत आहोत. मात्र, काही लोक उगाच आमच्यामागे लागले आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्याकडून ही रणनिती आखली जात आहे. मात्र, मोदी आणि मी त्यांना उत्तर देण्यासाठी सज्ज असून आगामी निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे आगामी लोकसभा निवडणूक महाराष्ट्रातून लढविणार असल्याची चर्चा आहे. त्यांनी कोठूनही निवडणूक लढवली तरी आम्हाला काहीच फरक पडत नाही. मात्र, आगामी निवडणुकीत त्यांची विकेट आम्हीच काढणार असे आठवले या वेळी म्हणाले. 

सेना-भाजपची युती होणार 
निवडणुकीमध्ये कुठल्याही पक्षाचे चिन्ह अथवा पाठबळ न घेता जिंकणे खूप कठीण आहे. मात्र, ते काम आमदार गणपत गायकवाड यांनी करून दाखविले. गायकवाड हे सर्वसामान्यांसाठी कार्यरत असून भाजपसोबत असून त्यांना आमचाही पाठिंबा आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युती करणार असून चिंता करण्याची गरज नसल्याचे आठवले या वेळी म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com