मोठी बातमी - बिना मास्क आता घराबाहेर पडाल तर होऊ शकते जेल

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 April 2020

आता तुम्ही काही महत्त्वाच्या कामासाठी, औषधं किंवा किराणा घेण्यासाठी जाताना मास्क वापरणं बंधनकारक असणार आहे.

मुंबई - महाराष्ट्रात मुंबईत सर्वात जास्त कोरोना बाधित रुग्णांची संख्या आहे. अशात मुंबईत  दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळतेय. स्वतः मुख्यमंत्र्यांनी याबाबत चिंता व्यक्त केलीये. हा काळ कोरोनाच्या गुणाकाराच्या काळ असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगितलंय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला काही महत्त्वाच्या सूचना देखील दिल्या आहेत. यातील अत्यंत महत्त्वाची सूचना म्हणजे घरातून बाहेर पडताना तोंडाला मास्क लावल्याशिवाय बाहेर पडू नये ही सूचना. याचीच आता मुंबईत प्रशासकीय स्तरावर अंमलबजावणी  होताना पाहायला मिळतेय. 

मोठी बातमी - CM उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला 'आज' केलेल्या ३ मोठ्या आणि महत्त्वाच्या सूचना

मुंबईतील कोरोनाचावाढता संसर्ग थांबवण्यासाठी BMC आयुक्त प्रवीण परदेशी यांनी महत्वाच्या ऑर्डर्स दिल्या आहेत. आता तुम्हाला काही महत्त्वाच्या कामासाठी, औषधं किंवा किराणा घेण्यासाठी जाताना मास्क वापरणं बंधनकारक असणार आहे. मास्क नसल्यास तुमच्यावर गुन्हा नोंदवला जाऊ शकतो, तुम्हाला अटक देखील होऊ शकते असा नियम महापालिकेने केलाय.

नागरिक थ्री प्लाय मास्क किंवा अगदी घरात उपलब्ध होणारा स्वच्छ फडक्याचा किंवा रुमालाचा मास्क म्हणून वापर करू शकतात. याबाबतचं एक परिपत्रक देखील महापालिकेकडून काढण्यात आलंय. 

मोठी बातमी -  विवीध ब्लड ग्रुप्स आणि कोणत्या ब्लड ग्रुपला आहे कोरोनाचा जास्त धोका, जाणून घ्या...

महाराष्ट्रातील चार वेगवेगळ्या पद्धतीची रुग्णालये : 

महाराष्ट्रात आता चार पद्धतीची रुग्णालयं असणार आहेत. सर्वात बेसिक लेव्हलवर यामध्ये  फिव्हर क्लिनिक, त्यानंतर कोरोनाची लक्षणं नसणाऱ्यांसाठी आणि अगदी सौम्य लक्षणं असणाऱ्यांसाठी वेगळं रुग्णालय. थोड्या प्रमाणात लक्षणं असणाऱ्यांसाठी वेगळी रुग्णालयं आणि कोरोनाची गंभीर लक्षणं अधिक इतर आजार ( हृदयविकार, मधुमेह, स्वसनाचे त्रास, रक्तदाब) असणाऱ्यांसाठी वेगळं सुसज्ज रुग्णालय असणार आहे. यामध्ये सर्व निष्णात डॉक्टर्स असणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलीये. 

wearing masks is now mandatory in mumbai BMC commissioner shares information


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wearing masks is now mandatory in mumbai BMC commissioner shares information