सावधान ! हवामान खात्याने जारी केलाय ऑरेंज अलर्ट, उद्या आणि परवा मुंबई, पुण्यात कोसळधार...

सावधान ! हवामान खात्याने जारी केलाय ऑरेंज अलर्ट, उद्या आणि परवा मुंबई, पुण्यात कोसळधार...

मुंबई : जून आणि जुलैमध्ये हरवलेला पाऊस आता परतणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाची दमदार एन्ट्री होईल असा अंदाज हवामानखात्याकडून वर्तवण्यात येतोय. या पार्श्वभूमीवर पुढील २४ तासांमध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. येत्या २४ तासात मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय.  

पुढील दोन दिवसात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. परिणामी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय. केवळ मुंबई कोकणात नव्हे तर मध्यमहाराष्ट्र आणि घाट माथ्यावरही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय. 

गेले काही दिवस मुंबई आणि उनागरात ढगाळ वातावरण आहे. रविवार २ ऑगस्ट आणि सोमवार ३ ऑगस्ट रोजी मुंबई ठाण्यात पावसाच्या सारी कोसळल्या. आता उद्या आणि परवा म्हणजेच ४ आणि ५ तारखेला मुंबई आणि उपनगरं, ठाणे, पालघर त्याचसोबत कोल्हापूर आणि पुण्यातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

या दरम्यान मुसळधार पावसासह जोरदार वारे देखील वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. परिणामी समुद्र खवळलेला राहील. त्यामुळे मच्छिमारांनीही समुद्रात जाऊ नये असं आवाहन करण्यात आलंय 

weather alert heavy rainfall forecast by IMD fishermen advised not to go in seas

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com