Rain News Update : वादळी वाऱ्यांमुळे डोंबिवलीत वीज पुरवठा खंडित

कल्याण डोंबिवली मध्ये पाऊस
Rain News Update : वादळी वाऱ्यांमुळे डोंबिवलीत वीज पुरवठा खंडित

डोंबिवली - गुरुवारी संध्याकाळी अचानक शहरात पावसाच्या सरी आल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली. चाकरमान्यांची घरी जाण्याची लगबग सुरू असतानाच पाऊस आल्याने पावसात भिजत त्यांना आपले घर गाठावे लागले.

डोंबिवलीत वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्याने काही ठिकाणी बत्ती गूल झाली होती. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी ब्लॅकआऊट सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. ऐन संध्याकाळी बत्ती गुल झाल्यामुळे आणि सध्या परीक्षाकाळ असल्यामुळे विद्यार्थ्यांची कुचंबना झाली.

Rain News Update : वादळी वाऱ्यांमुळे डोंबिवलीत वीज पुरवठा खंडित
Rain Update : महाबळेश्वर आणि पुणे दरम्यान ढग दाटले; राज्यात पुढील दोन तास पावसाची शक्यता

डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागात एका ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आंब्याच्या झाडाची फांदी महावितरण कंपनीच्या केबलवर पडल्यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.

ही फांदी केबलवर पडल्यामुळे महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ती सहजासहजी काढता येत नव्हती त्यामुळे अग्निशामक दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. या जवानांनी बंबावर चढून ही फांदी तोडून केबल पासून विलग केली त्यानंतर खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत झाला.

Rain News Update : वादळी वाऱ्यांमुळे डोंबिवलीत वीज पुरवठा खंडित
Unseasonal Rain : नैसर्गिक आपत्तीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी 'या' आहेत कृषी विभागाच्या मार्गदर्शक सूचना

ही घटना ताजी असतानाच पाथर्ली नाक्यावर इंटरनेट केबलला आग लागली. घटनास्थळी अग्निशामक दलाचे जवान दाखल झाले. या जवानांनी जीव धोक्यात घालून केबलला लागलेली आग विझवली आणि ही केबल महावितरणच्या केबलपासून विलग पाथर्ली केली. त्यानंतर या भागातील वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला.

अशीच परिस्थिती डोंबिवलीच्या नांदिवली परिसरात झाली होती धमाकेदार आवाज होऊन या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. ठाकुर्ली, बदलापूरच्या काही भागातही विजपूरवठा खंडित झाला होता. दरम्यान वीजपुरवठा सुरळीत होण्याकरिता बराचसा कालावधी लोटला. तोपर्यंत या भागात राहणाऱ्या रहिवाशांची त्रेधातिरपीट उडाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com