मुंबई पोलिसांना साप्ताहिक सुट्टया 

मंगेश सौंदाळकर
शुक्रवार, 1 जून 2018

मुंबई - आठ तासांच्या ड्युटीच्या यशस्वी प्रयोगानंतर आता मुंबई पोलिसांच्या हक्‍काच्या साप्ताहिक सुट्टीचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. 93 पोलिसठाणे आणि सशस्त्र विभागातील पोलिसांना साप्ताहिक सुट्ट्या मिळणार आहेत. सुट्ट्यांचे फलक पोलिस ठाण्याच्या दर्शनी भागात लावले जाणार आहेत. प्रथमच असा उपक्रम राबवला जात आहे. 

दत्ता पडसलगीकर यांनी मुंबई पोलिस आयुक्तपदाची सूत्रे घेतल्यानंतर दोन वर्षांपूर्वी प्रायोगिक तत्त्वावर देवनार पोलिस ठाण्यात आठ तास ड्युटीचा प्रयोग सुरू केला. याला चांगला प्रतिसाद मिळाल्याने बहुतांश पोलिस ठाण्यात आठ तासांची ड्युडी सुरू करण्यात आली. पोलिसांना पूर्वी साप्ताहिक सुट्ट्या तोंडी सूचनेद्वारे दिल्या जायच्या. त्यावरून वाद होत होते. हा प्रकार वरिष्ठांच्या निदर्शनास आल्याने यासंदर्भात नुकतीच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक झाली. यात साप्ताहिक सुट्ट्यांबाबत निर्णय घेण्यात आला. 

अशी आहे योजना... 
नव्या योजनेनुसार 93 पोलिस ठाणे, सशस्त्र विभाग (एलए)च्या पोलिसांना साप्ताहिक सुट्ट्यांचा लाभ मिळेल. प्रभारी हवालदार (इन्चार्ज) यांच्या अधिपत्याखालील पोलिस अधिकाऱ्यांपासून ठाणे अंमलदारांच्या साप्ताहिक सुट्ट्यांचा फलक संबंधित पोलिस ठाण्यातच लावला जाणार आहे. रिलिव्हर आणि सबरिलिव्हर यांनाही रविवारी साप्ताहिक सुट्टी असेल. आपत्ती काळात साप्ताहिक सुट्ट्या बंद झाल्यास सुट्ट्यांच्या नियोजनाप्रमाणे संबंधितांना त्याचा मोबदला दिला जाईल. 

एकूण अधिकारी-कर्मचारी 47,000 
महिला पोलिस ः 3,800 
उपनिरीक्षक, सहायक आयुक्त ः 7,500 

Web Title: Weekly holidays to Mumbai Police