BJP नंतर आता NCP च्या या 'बड्या' नेत्याने केली सुशांतसिंग राजपूत आत्महत्येच्या सखोल चौकशीची मागणी...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 18 June 2020

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं रविवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येने संपूर्ण बॉलिवूड जगाला हादरवलं.

मुंबई- बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं रविवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येने संपूर्ण बॉलिवूड जगाला हादरवलं. या बातमीने संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. सुशांतला नैराश्यानं ग्रासलं होतं आणि त्यामुळंच त्यानं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं असल्याचं सांगण्यात येतंय. पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये सुशांतने गळफास लावून आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे.

सुशांतच्या आत्महत्येनंतर अनेकांनी बॉलिवूडची घराणेशाही त्याच्या मृत्यूला जबाबदार असल्याचं बोललं जात आहे. यावरुन सध्या बॉलिवूडमध्ये दोन गट झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरही अनेकांनी घराणेशाही विरोधात मोहिम सुरु केली आहे. तसंच बॉलिवूडमधीलच काही घटकांमुळे त्यानं आत्महत्येचं पाऊल उचललं असा आरोपही करण्यात आला. बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनीही आता आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे.

BIG NEWS - मुंबईतील धारावी पॅटर्न आता संपूर्ण राज्यात राबवला जाणार...

सोशल मीडियावरही सुशांतचे चाहते वर्ग या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी करत आहेत. सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाकडं सोपवावा, अशी मागणी भाजपचे आमदार राम कदम यांनी राज्य सरकारकडं केली असताना आता राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही या प्रकरणाबाबत आपली भूमिका मांडली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन आपलं मत मांडलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. पाटण्यातून बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करण्यासाठी आलेला एक प्रतिभावान अभिनेता आपण गमावला आहे. हे खूप दुर्देवी गोष्ट आहे आणि भविष्यात कोणत्या नवोदित कलाकाराला अशा त्रासातून जावं लागू नये.

आव्हाडांनी आणखी एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे की, मी वैयक्तिकरित्या गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली असून या प्रकरणातील सत्य लोकांसमोर आलं पाहिजे अशी मागणी केली आहे. सुशांत सिंह राजपूत याचे सिनेमे थांबवण्यात आले होते का? त्याचे सिनेमांवर बंदी घालण्यात आली होती का? काही सिनेमांमधून त्याला बळजबरीने काढून टाकण्यात आलं होतं? असे अनेक प्रश्न निर्माण झालेत आणि त्यामुळे या प्रकरणात संशय निर्माण झाला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे

मोठी बातमी - ऍम्ब्युलन्सची गरज पडली तर वापर ही 'मोफत' सुविधा, उगाच पाच-दहा हजार देऊ नका...

भाजपनं राज्य सरकारकडे केली ही मागणी सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाकडं सोपवावा, अशी मागणी भाजपचे आमदार राम कदम यांनी राज्य सरकारकडं केली आहे. सुशांतच्या कुटुंबालाच महाराष्ट्र पोलिसांकडून तपास नको असेल तर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात सरकारला काय अडचण आहे, असा सवालही राम कदम यांनी उपस्थित केला आहे. राम कदम यांनी एक ट्विट करुन याबाबतची मागणी केली आहे.

सुशांत आत्महत्येच्या प्रकरणात अनेक नावं पुढं येत आहेत. देशभर चर्चा सुरू आहे. अनेक शहरांशी या प्रकरणाचा संबंध असू शकतो. शिवाय, महाराष्ट्र पोलिसावर आणि महाविकास आघाडी सरकारवर आमचा विश्वास नाही असं त्याचं कुटुंबच म्हणत असेल तर मग या प्रकरणाचा तपास सीबीआयकडं द्यायला काय हरकत आहे. महाराष्ट्र सरकारनं याबाबत निर्णय घ्यायला हवा,' असं राम कदम यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. गृहमंत्र्यांनी घेतली दखल सुशांतच्या आत्महत्येने काही प्रश्नही उपस्थित केलेत. काहींनी सुशांतच्या आत्महत्येचं मुळं कारण हे बॉलिवूडमधील घराणेशाही हे असल्याचा आरोप केला आहे.

BIG NEWS - दिलासादायक बातमी! राज्यात उपचार घेणाऱ्यांपेक्षा बरे झालेले रुग्ण अधिक; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याची आकडेवारी..

यामुळेच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुशांतच्या आत्महत्या संबंधित मुंबई पोलिस चौकशी करतील असं सांगितलं आहे. खरंच बॉलिवूडमधील स्पर्धेमुळं तो डिप्रेशनमध्ये गेला होता का? की काही कारणांमुळे नैराश्यात जाऊन आत्महत्या केली का? याची चौकशी केली जाईल, असं गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे.

well known  NCP leader and minister demands for detail enquiry of sushant singh rajputs case

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: well known NCP leader and minister demands for detail enquiry of sushant singh rajputs case