राज्यपालांवर कंगनाला भेटण्याचा दबाव होता का ? सचिन सावंतांचा सवाल

सुमित बागुल
Saturday, 19 September 2020

कंगना आणि राज्यपालांच्या भेटीनंतर सचिन सावंत यांनी थेट भेटीसाठी राज्यपालांवर कोणता दबाव होता का, याची विचारणा केली आहे

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकामागून एक वादग्रस्त विधानं करून सध्या कमालीच्या चर्चेत असणाऱ्या कंगनाला नुकतीच भेटण्याची वेळ दिली होती. मुंबई महापालिकेच्या कारवाईसंदर्भात कंगनाकडून राज्यपाल कोश्यारींची भेट घेण्यात आलेली. कंगना आणि राज्यपाल यांच्या भेटीनंतर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात विविध चर्चा देखील रंगल्या. या भेटीनंतर चर्चा अजूनही सुरूच आहेत. 

आज, काँग्रेचे नेते सचिन सावंत यांनी काही ट्विट करत कंगना आणि राज्यपाल कोश्यारी यांच्या भेटीवर बोट ठेवलंय. यामध्ये सचिन सावंत यांनी कंगनाला भेटण्यासाठी राज्यपालांवर कुणी दबाव टाकला होता का, असा सवाल देखील उपस्थित केलाय.  

महत्त्वाची बातमी - रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मुंबईकरांचा अंडी, चिकनवर ताव; मागणी वाढल्याने भाव कडाडले

महत्त्वाची बातमी कोकणपट्ट्यात अंबर अलर्ट जारी; मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा

वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत असलेल्या कंगनाने गेल्या रविवारी रविवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात जाऊन भेट घेतली होती. मुंबई महापालिकेने तिच्या कार्यालयावर बुल्डोझर फिरवल्यानंतर तिने याबाबतचे गाऱ्हाणं कोश्यारींसमोर मांडलं होतं. राज्यपाल आपले पालक असून माझ्याबाबतीत झालेल्या अन्यायाबाबत त्यांना माहिती दिली. मला न्याय मिळेल अशी आशा आहे आणि संजय मुख्यत्वे मुलींचा व्यवस्थेववर विश्वास टिकून राहील असं कंगना राज्यपालांच्या भेटीनंतर म्हणाली होती. राज्यपालांनी आपल्या मुलीचं गाऱ्हाणं जसं ऐकतात तसं बोलणं ऐकलंय असंही कंगना म्हणाली होती. कंगना आपल्या बहिणीसोबत राज्यपालांच्या भेटीला गेली होती.

आता कंगना आणि राज्यपालांच्या भेटीनंतर सचिन सावंत यांनी थेट "या भेटीसाठी राज्यपालांवर कोणता दबाव होता का", याची विचारणा केली आहे. यावर आता स्वतः कोश्यारी किंवा भाजप काय प्रतिक्रिया देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल 

were maharashtra governer koshayri pressurized to meet kangana ranaut 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: were maharashtra governer koshayri pressurized to meet kangana ranaut