प. बंगाल, म. प्रदेशातील औषधेही बाजारात

Medicine
Medicine

मुंबई - संरक्षण विभागाला पुरवलेली औषधे खुलेआम बाजारात विकली जात असताना मध्य प्रदेश आणि पश्‍चिम बंगालच्या सरकारी रुग्णालयांतील औषधेही मुंबई आणि नवी मुंबईत कमी किमतीत विकली जात असल्याचे उघड झाले. 

संरक्षण विभागाच्या औषधांचा काळाबाजार उघडकीस आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत या राज्यांतील सरकारी रुग्णालयांतील साठा हाती लागला. संरक्षण विभागांची औषधांवरील ‘शिक्का’ काढून त्यांची खुलेआम विक्री करणाऱ्या  औषध विक्रेत्या टोळीला पकडण्यासाठी अधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. एफडीच्या इंटेलिजन्स ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबईतील निवान फार्माक्‍युटिकल्स, देसाई फार्मासिस्ट, गॅलेक्‍सी, मंगल, मुलुंडमधील सेफलाईफ अादींवर छापे घातले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com