पश्‍चिम द्रुतगती महामार्गावर ‘खड्डाजंगी’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जुलै 2019

वांद्रे ते दहिसर दरम्यानच्या पश्‍चिम द्रुतगती महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे आधीच वाहतूक कोंडी होत असलेल्या या मार्गावरून प्रवास करताना प्रवाशांचा जीव मेटाकुटीला येत आहे.

मुंबई -  वांद्रे ते दहिसर दरम्यानच्या पश्‍चिम द्रुतगती महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे आधीच वाहतूक कोंडी होत असलेल्या या मार्गावरून प्रवास करताना प्रवाशांचा जीव मेटाकुटीला येत आहे. या महामार्गाची देखभाल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) केली जाते. प्रशासन आणि कंत्राटदाराच्या दुर्लक्षामुळे महामार्ग ठिकठिकाणी खड्ड्यात गेला आहे. त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्‍यताही वाहन चालकांकडून व्यक्त होत आहे. 

वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे पश्‍चिम द्रुतगती महामार्गावरील भार प्रचंड वाढला आहे. गर्दीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणे वेळखावू बनले आहे. महामार्गावर अंधेरी ते दहिसर या मेट्रो ७ चे काम सुरू झाल्यापासून महामार्गावरील वाहतुकीचा वेग आणखी मंदावला आहे. दिवसभर महार्गावर होणाऱ्या गर्दीमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. त्यात आता पावसामुळे खड्ड्यांची भर पडली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Western Express Highway pothole