
मुंबई : एक उंदीर 2 हजार 800 रुपयांचा. तुम्ही म्हणाल, असं काय आहे या उंदरात? की ज्यासाठी 2 हजार 800 रुपये मोजायचेत? आता हा प्रश्न आपण पश्चिम रेल्वेलाच विचारयला हवा. म्हणजे हा प्रकार काय आहे, हे लक्षात येईल.
घरात उंदीर झाले तर आपण काय करतो? छोटे सापळे आणतो.. त्याला एखादी चपाती लावतो आणि उंदीर पकडतो किंवा मग ग्लू ट्रॅप, रॅट किल वगैरे पर्याय असतातच. म्हणजे फार फार तर दीडशे दोनशे रुपयांचा खर्च. पण आपली पश्चिम रेल्वे खूप श्रीमंत आहे. तिनं एका उंदरावर 3 हजार रुपये खर्च केलेत. जवळपास 5 हजार उंदरांवर सुमारे दीड कोटी रुपये उधळलेत. आता हे खोटं वाटत असेल, तर एक सोप्पं गणित करुन बघू.
महत्त्वाची बातमी : मुंबईकरांना महागाईपासून दिलासा; भाज्यांचे भाव घसरले!
आता तुम्हीच विचार करा आपण तिकीटाचे म्हणून जे पैसे मोजतो ते जातात कुठे.. पण यावरही रेल्वे प्रशासनाकडे स्पष्टीकरण आहेच.
हेही वाचा : बेस्टतर्फे 12 मार्गांवर वातानुकूलित बससेवा सुरू
पश्चिम रेल्वेच्या अधिकार्यांनी माहिती दिली की,उंदीर मारण्यासाठी खर्चची सरासरी काढणं कठीण आहे. औषधांनी मृत्यू पावलेल्याची ही संख्या आहे. मात्र जे उंदीर दुसरीकडे जाऊन मुत्यू पावले त्यांचा हिशेब लावण्यात येत नाही.
आता खर्चाचं गणित इकडचं तिकडे होईलही. पण प्रश्न हा आहे, की प्रवाशांना उदरांप्रमाणेच कोंबणारी रेल्वे यंत्रणा उंदरांवर कोटींची उधळण करत असेल तर आपण करायचं काय? आपण करणार काय म्हणा, घड्याळ बघायचं इंडिकेटर पाहायचा आणि लोकल पकडून आपल्या बिळात शिरायचं
WebTitle : western railway spent around five crore for killing three thousand rats