पश्चिम रेल्वेची वाहतूक तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मे 2019

गोरेगाव स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत आज सकाळी साडे सातच्या सुमारास बिघाड झाला. यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली.

पश्चिम रेल्वेची वाहतूक तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत
मुंबई : पश्चिम रेल्वेवरील वाहतूकीमध्ये आज (बुधवार) तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रेल्वे 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत. गोरेगाव स्थानकात तांत्रिक बिघाड झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत आज सकाळी साडे सातच्या सुमारास बिघाड झाला. यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. यामुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पश्चिम रेल्वे प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. मध्य रेल्वेच्या कोपर स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने वाहतूक उशिराने सुरु होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Western Railway traffic disruption Goregaon technical breakthrough