Breaking: मुंबईतील चाकरमान्यांसाठी पश्चिम रेल्वे लोकलच्या फेऱ्या वाढवणार; सोमवारपासूनच धावणार जादा ट्रेन

तुषार सोनवणे
Friday, 18 September 2020

मुंबईतील वाढत्या कोरोनारुग्णांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेनेदेखील मोठा निर्णय घेतला आहे.

मुंबई - मुंबईतील वाढत्या कोरोनारुग्णांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेनेदेखील मोठा निर्णय घेतला आहे. सध्या पश्चिम रेल्वेवर 350 उपनगरीय सेवा चालवल्या जात आहेत. त्याही फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी होय. परंतु या उपनगरीय गाड्यांमध्ये वाढती गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने गाड्यांची संघख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.अशी माहिती एनआयने ट्वीट करून दिली आहे.

एनआयने केलेल्या ट्वीटनुसार सोमवार 21 सप्टेंबर पासून पश्चिम रेल्वे मार्गावर 350 एवजी 500 उपनगरीय गाड्या सोडणार आहे. गाड्यामध्ये होणारी गर्दी आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन होत नसल्याने पश्चिम रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Western Railway will increase local trains for Mumbais employee