पश्‍चिम रेल्वेचे दिवसाला एक कोटी रुपयांचे उत्पन्न; लॉकडाऊनंतर प्रवाशांची संख्या वाढली

पश्‍चिम रेल्वेचे दिवसाला एक कोटी रुपयांचे उत्पन्न; लॉकडाऊनंतर प्रवाशांची संख्या वाढली

मुंबई  : सध्या पश्‍चिम रेल्वेवर प्रवास करणाऱ्यांची संख्या नऊ लाखांवर पोहोचली आहे. पश्‍चिम रेल्वेवर सोमवार, 18 जानेवारी रोजी तिकीट आणि पासधारक मिळून नऊ लाख दोन हजार 949 जणांनी प्रवास केला. यातून पश्‍चिम रेल्वेला दिवसाला एक कोटी 95 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. 

पश्‍चिम रेल्वे मार्गावरून दररोज सुमारे एक हजार 201 फेऱ्या होत आहेत. यातून उपनगरी रेल्वेगाड्यांमधून सामान्यांना प्रवासास मज्जाव करण्यात आला आहे; मात्र राज्य सरकारने अनुमती दिलेल्या क्षेत्रातील प्रवाशांना आणि महिलांना प्रवास करता येत आहे. 1 जानेवारीला तिकीट आणि पासधारक मिळून सात लाख 57 हजार 879 जणांनी प्रवास केला. यातील तिकीटधारकांची संख्या एक लाख 44 हजार 607 इतकी आहे. तिकीट व पासधारक यांच्याकडून 69 लाख 87 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे; तर 18 जानेवारीला नऊ लाख दोन हजार 949 जणांनी प्रवास केला. यात तिकीटधारकांची संख्या एक लाख 77 हजार 905 आहे. तिकीट व पासधारक यांच्याकडून एक कोटी 95 हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. 

पश्‍चिम रेल्वेवर डिसेंबर 2020 मध्ये सरासरी सात लाख जण प्रवास करीत होते. सोमवार, 18 जानेवारीपासून रोज सुमारे नऊ लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. कोरोना संक्रमणामुळे राज्य सरकारने अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचारी, वकील, परीक्षार्थी, महिलांना ठराविक वेळेत प्रवास करण्याची मुभा देण्यात आल्याचे पश्‍चिम रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले. 

.प्रवासी संख्या 

1 जानेवारी ः 7, 57, 879 
6 जानेवारी ः 8, 25000 
12 जानेवारी ः 8, 41, 811 
14 जानेवारी ः 8, 52 789 
18 जानेवारी ः 9, 02,949 

Western Railways daily income of one crore rupees The number of passengers increased after the lockdown

-------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com