सर्व महिलांना लोकल प्रवासास अजूनही परवानगी का नाही ? समोर आलं खरं कारण

सुमित बागुल
Monday, 19 October 2020

घटस्थापनेचा मुहूर्त साधत महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांना मुंबईच्या लोकलमधून विना QR कोड प्रवासास परवानगी दिली खरी मात्र रेल्वे विभागाने सरकारकडून घेतल्या गेलेल्या निर्णयावर होकारार्थी मोहोर लावली नाही

मुंबई : घटस्थापनेचा मुहूर्त साधत महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांना मुंबईच्या लोकलमधून विना QR कोड प्रवासास परवानगी दिली खरी मात्र रेल्वे विभागाने सरकारकडून घेतल्या गेलेल्या निर्णयावर होकारार्थी मोहोर लावली नाही. राज्य सरकारच्या निर्णयाप्रमाणे सर्व महिलांना रेल्वेतून प्रवासाची मुभा देण्यात आलेली. मात्र रेल्वेकडून सर्व महिलांना लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी का देता येणार नाही याची अनेक कारणं सांगितली आहेत. सध्या अनलॉकचा टप्पा सुरु आहे, अशात मुंबईतील ऑफिसेस बऱ्यापैकी सुरु होतायत. त्यामुळे अनेकांना घराबाहेर पडत ऑफिस गाठावं लागतंय. 

महत्त्वाची बातमी : फेक टीआरपी प्रकरण! अर्णब गोस्वामी मुंबई पोलिसांना चौकशीसाठी सहकार्य करणार

दरम्यान यावर रेल्वे विभागाकडून सरकारला काय विचारणा करण्यात आलीये वाचा.  

सध्या पश्चिम रेल्वेवर ७०० ते मध्य रेल्वेवर ७०६ ट्रेन्स सुरु आहेत. रेल्वेने सरकारकडून किती प्रमाणात महिला प्रवासी वाढू शकतील ही आकडेवारी मागीतली आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार रेल्वेकडे याबाबतचा सर्व डेटा आधीच उपलब्ध आहे. सोबतच पश्चिम रेल्वेने सरकारकडे सर्व महिलांसाठी ट्रेन चालवायच्या असतील तर त्याबाबतची कार्यपद्धती काय असेल हे अपेक्षित असल्याचं म्हटलंय. दरम्यान, रेल्वेला सर्व महिलांना ट्रेनमधून प्रवास करू द्यायचा नाहीये का? असा सवाल विचारत एकंदरीत रेल्वेची भूमिका अनेक प्रश्न उपस्थित करणारी असल्याचं प्रवास करू इच्छिणाऱ्या महिलांचं म्हणणं आहे.

महत्त्वाची बातमी आजपासून कोकणात मुसळधार पावसाची शक्‍यता; मुंबईतही मेघगर्जनेसह बरसणार

रेल्वे सेवा सध्या केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या नागरिकांसाठी खुली आहे. त्यामुळे सामान्य मुंबईकरांना आपापली ऑफिसेस गाठणं अत्यंत कठीण होऊन बसलंय. एकीकडे ट्रेन सुरु न झाल्याने मुंबईच्या रस्त्यांवर ट्राफिक वाढलाय. त्यात बसेस आणि खासगी वाहनांनी प्रवास करणं मुंबईकरांच्या खिशाला खर्चिक असल्याचं सामान्य नागरिकांचं म्हणणं आहे.

western railways wrote to state government and asked for the quantum of passengers


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: western railways wrote to state government and asked for the quantum of passengers