
मुंबईतील नेहरू सेंटरमध्ये आज महाविकास आघाडीची औपचारिक बैठक पार पडली. या बैठकीनंतर पृथ्वीराज चव्हाण आणि जयंत पाटील यांनी पत्रकारांसोबत चर्चा केली.
मुंबईतील नेहरू सेंटरमध्ये आज महाविकास आघाडीची औपचारिक बैठक पार पडली. या बैठकीनंतर पृथ्वीराज चव्हाण आणि जयंत पाटील यांनी पत्रकारांसोबत चर्चा केली. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पार पडलेल्या औपचारिक बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असं माध्यमांना सांगितलंय. दरम्यान आता उद्या पुन्हा महाविकास आघाडीची बैठक पार पडणार आहे. काही मुद्द्यांवर अजूनही चर्चा बाकी आहे असंही कॉंग्रेसचे प्रवक्ते आणि जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.
Prithviraj Chavan, Congress:All 3 parties had positive discussions about govt formation. We've reached consensus on many issues but talks to continue tomorrow.Whatever Sharad Pawar Ji has said is on record,I won't speak on that. When we've discussed all things,we'll speak on them pic.twitter.com/dHiXUB3Cic
— ANI (@ANI) November 22, 2019
महाराष्ट्रातील जनतेसाठी आणि महाराष्ट्रातील राजकारणातील अत्यंत महत्त्वाची बैठक मुंबईच्या वरळीतील नेहरू सेंटरच्या चौदाव्या मजल्यावर पार पडली. आज पार पडलेली महाविकास आघाडीची ही पहिलीवहिली औपचारिक बैठक तब्बल दोन तास सुरु होती. या बैठकीत मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर म्हणजेच मुख्यमंत्री ऑफिसमध्ये कोण बसणार? याबद्दलची सविस्तर चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
सरकार कोणत्या मुद्द्यांच्या आधारे चालवायचं? याबाबत अद्याप चर्चा सुरु असल्याची माहिती राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनी दिली. यामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाकडून एकमत झाल्याचं देखील शरद पवार यांनी माध्यमांना सांगितलं.
"अतिशय साकारात्मक पद्धतीने बैठक झाली, या बैठकीत एकही प्रश्न अनिर्णीत ठेवायचा नाही, सर्व चर्चा झाल्यानंतर जनतेसमोर जाण्याचं आम्ही ठरवलं आहे" असं उद्धव ठाकरे यानी म्हटलंय.
Webtitle : what did prithviraj chavan said after official meet of shivsena congress and NCP