तीन बड्या अभिनेत्रींच्या एनसीबी चौकशीबाबत आज दिवसभरात काय घडलं; एनसीबीला त्यांनी काय उत्तरे दिली? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तीन बड्या अभिनेत्रींच्या एनसीबी चौकशीबाबत आज दिवसभरात काय घडलं; एनसीबीला त्यांनी काय उत्तरे दिली?

 या प्रकरणात बॉलिवूडमधील सध्याची सर्वात नामांकित अभिनेत्री दीपिका पदुकोण हिची आज NCB कडून चौकशी केली गेली. सोबतच सारा अली खान, आणि श्रद्धा कपूर यांचीही आज चौकशी केली गेली.

तीन बड्या अभिनेत्रींच्या एनसीबी चौकशीबाबत आज दिवसभरात काय घडलं; एनसीबीला त्यांनी काय उत्तरे दिली?

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर त्याच्या तपासामध्ये अनेक महत्त्वाच्या बाबी समोर येत आहेत. यापैकीच एक म्हणजे बॉलिवूड आणि ड्रग्सचं कनेक्शन. सध्या रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविकच्या चौकशीमधून आणि त्यांच्या मोबाईल चॅटवरून अनेक बडे खुलासे होतायत. या प्रकरणात बॉलिवूडमधील सध्याची सर्वात नामांकित अभिनेत्री दीपिका पदुकोण हिची आज NCB कडून चौकशी केली गेली. सोबतच सारा अली खान, आणि श्रद्धा कपूर यांचीही आज चौकशी केली गेली.

दीपिकाच्या चौकशीबाबत दिवसभरात काय घडलं?
 आज सकाळी दहा वाजेदरम्यान, दीपिका पदुकोण एनसीबी कार्यालयात पोहचली.तब्बल पाच ते साडे पाच तास चौकशी केल्यानंतर आता दीपिका पदुकोण NCP कार्यालयातून निघाली आहे. सकाळी माध्यमांना गुंगारा देत ज्या क्रेटा गाडीतून दीपिका पदुकोण चौकशीसाठी आली होती त्याच क्रेटा गाडीतून दीपिका पदुकोण चैकशीनंतर परतली आहे. सुरवातीला दीपिका पदुकोणकडून जबाब नोंदवण्यात आला. दीपिका आणि करिश्माची म्हणजेच दीपिकाच्या मॅनेजरची समोरासमोर बसून चौकशी करण्यात आली.  

आजच्या चौकशीमध्ये दीपिकाने सर्वात मोठा खुलासा केलाय, तो म्हणजे त्या WhatsApp ग्रुपचा, Whats App ग्रुपच्या माध्यमातून चॅट झालं होतं. मात्र स्वतः दीपिकाने कधीही ड्रग्सचं सेवन केलं नव्हतं असं स्टेटमेंट दीपिकाने दिलं आहे. सुरवातीला दीपिका काही उडवा उडवीची उत्तरं देत होती, अशीही बातमी समोर आलेली. मात्र  दीपिका आणि करिश्मा प्रकाशची समोरासमोर चौकशी केल्यानंतर दीपिकाने Whats App ग्रुपबद्दल कबुली दिली. चौकशीनंतर.दीपिकाने माध्यमांना कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही.

सारा अली खानच्या चौकशीबाबत आज काय घडलं?

दुपारी 1 वाजे नंतर एनसीबीच्या कार्यालयात सारा अली खान देखील  हजर झाली. ड्रग्जप्रकरणी नाव आल्यामुळे तीला बुधवारी एनसीबीने समन्स बजावले होते. साराने एनसीबीला दिलेल्या माहितीत सुशांत हा ड्रग्ज घेत असल्याचे म्हटले आहे. परंतु आपण ड्रग्ज घेत नसल्याचे साराने म्हटले आहे. सुशांत सिंह राजपूत हा आधीपासून म्हणजेच रिया चक्रवर्ती त्याच्या आयुष्यात येण्या आधीपासूनच ड्रग्स घेत होता. अशा आशयाचं स्टेटमेंट सारा अली खान हिने दिलंय. सुशांत सिंह राजपूत आणि तिच्यामधील नात्याबद्दलही तिने खुलासा केलाय. 'केदारनाथ' चित्रपटाच्या शूटदरम्यान आपण रिलेशनमध्ये असल्याचं साराने म्हटलंय. मात्र सारा अली खान हिने स्वतः कधी ड्रग्स सेवन केलंय याचा इन्कार केलाय. 6 वाजे नंतर साराचीही एनसीबीने चौकशी थांबवली. त्यानंतर ती घराकडे रवाना झाली

श्रद्धा कपूरच्या चौकशीबाबत आज काय घडलं?

सारा अली खानप्रमाणेच श्रद्धा कपूरदेखील दूपारी 1 वाजेनंतर एनससीबीच्या कार्यालयात हजर झाली होती. अधिकाऱ्यांनी तिला ड्रग्जबाबत कसून विचारणा केली. तसेच सुशांतसिंह सोबत झालेल्या पार्टीबाबतही विचारणा केली. पवनामध्ये झालेल्या पार्टीत ड्रग्स होतं हे श्रद्धा कपूर ने मान्य केलंय. मात्र मी स्वतः ड्रग्स घेतले नाही, घेत नाही असं श्रद्धा कपूर म्हाणालीये. श्रद्धा सायंकाळी 6 वाजेनंतर एनसीबी कार्यालयातून बाहेर पडली आहे.

चौकशी नंतर हा निष्कर्ष काढता येतो

श्रद्धा आणि सारा यांच्या स्टेटमेन्टमधून सुशांत सिंह राजपूत हा आधीपासून ड्रग्स घायचा हेच समोर येतंय. रिया देखील सुशांत हा ड्रग्स घेत होता हे आधीच म्हाणालीये. दरम्यान,  आता या दोघींच्या स्टेटमेंटवरून रियावर सुशांतला ड्रग्सची नशा करण्यास भाग पाडलं किंवा रियाने सवय लावल्याने सुशांतने ड्रग्स घेणं सुरु केलं आणि त्या ड्रग्समध्ये त्याने आत्महत्या केली या आरोपांचं वजन कमी होतंय असं म्हंटल तर वावगं ठरू नये. 

loading image
go to top